उरण : सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने विसर्जनासाठी आलेल्या भक्तांची तारांबळ उडाली होती मात्र तासाभराने पावसाने उसंत घेतल्या नंतर पुन्हा एकदा विसर्जनाला सुरुवात झाली असून भक्तांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे टाळ, मृदुंग व भजनाच्या तालावर व ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा देत गणेशभक्तानी मिरवणुका काढून विसर्जनाच्या ठिकाणी येत होते. तर उरण तालुक्यातील गावागावांत गावातील तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते. यावेळी उरण शहरातील विसर्जनाचे मुख्य ठिकाण असलेल्या नगरपरिषदेच्या विमला तलावात 200 पेक्षा अधिक गणेशमूर्ती चे विसर्जन होणार असल्याचा अंदाज नगरपरिषदे कडून व्यक्त करण्यात आला आहे. विसर्जन शांततेत व शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी उरण नगरपरिषदेचे कर्मचारी,पोलीस,होमगार्ड,स्काऊटचे विद्यार्थी तसेच समाजसेवी संस्थांचे कार्यकर्ते यावेळी मदतीचे काम करीत आहेत. तर पोलिसांकडून वाहतूक व्यवस्था व गर्दी नियंत्रित करण्यात येत आहे. त्यासाठी ध्वनिक्षेपावरून गणेशभक्तांना सूचना देण्यात येत होत्या. दुसरीकडे गणेशभक्तांकडून निर्माल्य तळ्यात न टाकता निर्माल्य कलशात टाकण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उरण शहरातील गणेशमूर्तीचे विसर्जन हे रात्री 8 वाजल्यानंतर वेगाने होणार असल्याची माहिती उरण नगरपरिषदे चे मुख्याधिकारी व प्रशासक संतोष माळी यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा