वादळी पावसामुळे उरणच्या करंजा,मोरा या बंदरातून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या ९० टक्के बोटी किनाऱ्यावर परतल्या असून उर्वरित बोटोनी ही परतीचा मार्ग धरला आहे. त्यामुळे या विकेंडला बाजारात मासळीची कमतरता भासणार आहे.
हेही वाचा >>> मुंब्रा बायपास रस्त्यावर सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा; वाहतूक व्यवस्था विस्कळीत
मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच बुधवार पासून समुद्रात वादळी वारे ही वाहू लागले आहेत. या वादळामुळे खोल समुद्रात मासेमारी करणे धोकादायक झाले असल्याने अनेक बोटींचे नुकसान टाळण्यासाठी मासेमारी न करताच अनेक बोटी बंदरात परतू लागल्या आहेत. दोन दिवसांवर विकेंड आला आहे. या कालावधीत खवय्या कडून मासळीला अधिक मागणी असते मात्र बोटी मासेमारी न करताच परतल्याने बाजारात मासळीची आवक घटणार आहे. त्यामुळे खवय्यांना या विकेंडला ताज्या मासळी पासून वंचित राहावे लागणार आहे.
मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे जाळ्यात मासळीच मिळत नसल्याने व वादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मासेमारी बोटी परत येऊ लागल्याची माहिती निशांत कोळी यांनी दिली आहे.