ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम

भाजपच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधातील बंडाला साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणाऱ्या शिवसेनेने ( शिंदे) ऐरोलीत मात्र बंडोबांच्या मोठ्या समूहालाच अभय दिल्याचे चित्र आहे.

Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम ( छायाचित्र सौजन्य – Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे FB page )

नवी मुंबई : भाजपच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधातील बंडाला साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणाऱ्या शिवसेनेने ( शिंदे) ऐरोलीत मात्र बंडोबांच्या मोठ्या समूहालाच अभय दिल्याचे चित्र आहे. भाजप नेते गणेश नाईक यांच्याविरोधात पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले रिंगणात आहेत. चौगुले यांना पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांची खुलेआम साथ असली तरी त्याकडे मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने ढुंकूनही पाहिलेले नाही. विशेष म्हणजे स्वत: गणेश नाईक हेदेखील बंडखोरांची मनधरणी करत नसल्याने ऐरोलीत शिवेसना (शिंदे) विरुद्ध नाईक हा सामना टिपेला पोहचला आहे.

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघांत भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षात बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. बेलापुरात मंदा म्हात्रे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी केलेली बंडखोरी राज्यातील राजकीय वर्तुळातही गाजली. संदीप यांचे बंड ताजे असताना बेलापुरात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांनीही बंडखोरी केली.

eknath shinde slams maha vikas aghadi government in kalyan
विकास विरोधी, शिवसेनेचा विचार काँग्रेसच्या दावणीला बांधलेले सरकार उलथवून टाकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
brigadier Sudhir sawant
शिवसेना (शिंदे गट) नेते माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी बांधले शिवबंधन
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला

ऐरोलीत भाजपने गणेश नाईक यांनाच उमेदवारी दिली आहे. तेथे नाईक यांच्याविरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले रिंगणात आहेत. नवी मुंबईत असा बंडखोरांचा सामना रंगला असताना तीन दिवसांपूर्वी भाजपने संदीप नाईक यांच्यासह पक्षाच्या २५ माजी नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. भाजप आपल्या बंडखोरांवर कारवाई करत नसेल तर आम्ही का करावी असा सवाल शिवसेना (शिंदे) पक्षात उपस्थित केला जात होता. अखेर भाजपने बंडखोरांवर कारवाई करताच शिवसेना (शिंदे) पक्षानेही मंगळवारी सायंकाळी पक्षाच्या सात पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना विजय नाहटा यांच्या बंडाला उभारी देणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांकडे मात्र शिवसेना (शिंदे) पक्षाने डोळेझाक केल्याची चर्चा आता रंगली आहे. नाहटा यांच्या बंडाला नेरुळ भागातील पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनी भलतीच हवा दिली होती. शिवसेनेतील बंडानंतरही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलेला हा पदाधिकारी पुढे नाहटांनी उपकृत केल्याची चर्चा होती. या पदाधिकाऱ्याने नाहटा यांच्या बंडाला उघड साथ दिली खरी मात्र कारवाईच्या कचाट्यातून त्याची आश्चर्यकारकरीत्या सुटका झाली आहे. गणेश नाईक यांनीही या ठिकाणी पक्षापेक्षा स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा प्रचारात उतरवली आहे. त्यामुळे नवी मुंबईचे दौरे करणारे भाजपचे नेते ऐरोलीपेक्षा बेलापूरमध्येच ठाण मांडून असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा… Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: “लवकर फायनल करा, नाहीतर दोघं-तिघं वेडे होतील..”, धनंजय मुंडेंचा विरोधकांना टोला!

ऐरोलीतील बंडाला खुली साथ

बेलापुरात किमान सात पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई केल्याचे चित्र शिवसेना (शिंदे) पक्षाकडून उभे केले गेले. ऐरोलीत मात्र गणेश नाईक यांच्याविरोधातील बंडाला शिवसेना (शिंदे) पक्षाची खुली साथ आहे की काय असे चित्र आहे. चौगुले यांचे बंड रोखण्यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून सुरुवातीपासून फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्यांच्या बंडखोरीला पक्षातील जवळपास २५ माजी नगरसेवकांची खुली साथ आहे. पक्षाचे पदाधिकारी, प्रभावी नेते, कार्यकारिणीतील सदस्य अशी सर्व मंडळी चौगुले यांच्याबरोबर खुलेआम फिरत आहेत. असे असताना त्यांच्यापैकी एकावरही अजून कारवाई झालेली नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In airoli and belapur assembly election eknath shinde and shiv sena role asj

First published on: 14-11-2024 at 13:35 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या