नवी मुंबई : नवी मुंबईतील बोनकोडे गावातील मयुरेश नावाच्या इमारतीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे तातडीने रातोरात इमारत रिकामी करण्यात आली. बोनकोडे गावात मयुरेश नावाची इमारत होती. या इमारतीत तळ मजल्यावर एक बंद गाळा होता. येथे भंगार साहित्य ठेवले जात होते. काल रात्री साडेदहा अकराच्या सुमारास याच भंगार सामानात ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत महिती मिळताच विभाग कार्यालयातील अधिकारी, पोलीस तसेच अग्निशमन दल पोहचले होते. या घटनेत कुठलीही जीवित हानी अथवा कोणी जखमी झाले नाही.स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे.
हेही वाचा… उद्घाटनाशिवाय नवी मुंबई मेट्रो सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, नागरिकांची प्रतीक्षा संपली!
हेही वाचा… नवी मुंबई : दुकानाचं शटर उचललं, चोरी केली पण…; पोलिसांच्या तावडीत ‘असा’ सापडला चोर
सदर इमारत धोकादायक असल्याने रिकामी करावी अशी नोटीस यापूर्वी दोन वेळा बजावण्यात आली आहे. इमारत तळ मजला अधिक चार मजले अशी असून इमारतीत सध्या केवळ दोन कुटुंब राहत होते. ही घटना घडल्यावर त्यापैकी एका कुटुंबाला स्व. अण्णासाहेब पाटील सभागृहात हलवण्यात आले आहे तर अन्य कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी राहणे पसंत केले. अशी माहिती कोपरखैरणे मनपा सहाय्यक आयुक्त सुनील काठोळे यांनी दिली.