नवी मुंबई : दिवाळीच्या फराळ सोबत आंबे ? आश्चर्य वाटेल पण हे  शक्य आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर यंदा पहिल्यांदाच एपीएमसी फळ बाजारात आंब्याची आवक झाली आहे. मौसमतील पहिला आंबा आल्यावर त्याची विधीवद पूजा व्यापारी करतात मात्र यंदा भारतीय मौसम पूर्व आंबा आल्याने व्यापाऱ्यांनी त्याची पूजा केली. आफ्रिका खंडातील मलावी देशातून आंब्याच्या ५५० पेट्या आवक झाली असून या आंब्याला ४ ते ५ हजार रुपये प्रति पेटी दर मिळाला आहे. . ऐन दिवाळीत आंबे खवय्यांणा आंब्याची चव चाखायला मिळणार असून अवघ्या १० मिनिटात या सर्व आंब्यांची विक्री देखील झाली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा-उरण : कळंबुसरे गावात अजगराने कुत्रा गिळला

हापूस आंब्या प्रमाणेच या आंब्याची चव आहे. सध्या साडेपाचशे पेट्या आल्या आहेत ही आवक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून वाढणार आहे. मलावीचा आंबा मौसम डिसेंबर पर्यंत असणार आहे ,तर डिसेंबर नंतर भारतीय आंबा बाजारात येणे सुरू होईल. अशी माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.