नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेबाहेर गुरुवारी सकाळी शिक्षक मागणीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. शाळेच्या प्रवेशद्वारावरच पालक व विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश न करता आम्हाला शिकवण्यासाठी शिक्षक द्या असा घोषणा देत विद्यार्थ्यांनी व पालकांनी आंदोलन केले.
मागील वर्षभरापासून कोपरखैरणे येथील महापालिकेच्या सीबीएसई शाळेमध्ये १३७५ विद्यार्थी असताना त्यांना शिकवण्यासाठी फक्त पाचच शिक्षक उपलब्ध आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर दुसरीकडे महापालिका केवळ लवकरच शिक्षक भरती करू असे वारंवार आश्वासन देत आहेत त्यामुळे आज अखेर पालकांनी विद्यार्थ्यासमवेत शाळेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केले व विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत प्रवेश करू दिला नाही.