नवी मुंबई : नद्या प्रदूषण मुक्त करा, शाळा पोषण आहारात अंड्यांचा समावेश बंद करा.. अशा मागण्या वारकरी संप्रदाय तर्फे करण्यात आल्या आहेत. खारघर येथे संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच वारकरी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी राज्य शासन दरबारी या मागण्यात ठेवण्यात आल्या आहेत.
खारघर येथे संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच वारकरी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये वारकरी संप्रदाया तर्फे महत्वाचे ठराव मांडण्यात आलेत. यामध्ये शहरांच्या लगत असलेल्या अनेक औद्योगिक वसाहत मधून प्रदूषित रासायनिक पदार्थ थेट नदीत सोडले जातात त्याच बरोबर शहरातील नद्या या कचरा कुंड्या बनल्या आहेत.
हेही वाचा…पत्नीवर अॅसीड हल्ला, पनवेल तालुक्यातील घटना
त्यामुळे सदर नद्या खास करून तीर्थ क्षेत्रा जवळील नद्या प्रदूषणमुक्त कराव्यात, तीर्थक्षेत्राजवळ मांस विक्रीला बंदी आणावी आणि राज्य सरकारने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावे असे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेत. या निर्णयांची सकारात्मक अंमलबजावणी न झाल्यास वारकरी संप्रदाय उग्र रूप धरण करुन सरकारला जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया वारकरी संप्रदायाचे सचिव नरहरी चौधरी यांनी दिली. यावेळी शालेय पोषक आहारातील अंड्यांचा समावेश बंद कारण्याबाबत आग्रही असल्याचे सांगण्यात आले. यावर अंमलबजावणी झाली नाही तर सरकारला नक्कीच जागा दाखवू असा इशाराही यावेळी देण्यात आला.