नवी मुंबई शहरात विशेषतः कोपरखैरणे विभागात पार्किंगची समस्या जटील होत आहे. सिडको वसाहतीती तोकडे रस्ते, रेल्वे स्थानक वगळता एकही असे सुसज्ज वाहनतळ नाही. त्यामुळे कोपरखैरणेत पार्किंगचा पुरता बोजवारा उडत आहे. कोपरखैरणे सेक्टर आठ येथील विभागात महापालिकेचे खेळासाठी असलेले मैदान आता वाहनतळ बनत चालले आहेत. मोकळ्या मैदानावर वाहनांनी कब्जा घेतला आहे. शालेय विध्यार्थ्यांना सुटीच्या कालावधीत तर इतर मुलांनी खेळण्यास जायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… आता लवकरच बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा

कोपरखैरणे सेक्टर पाच ते सेक्चर आठ येथील मैदानात राजरोसपणे वाहन पार्क केली जात आहेत. याठिकाणी मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी हे भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या मैदानाचा मुलांना उपयोगच होत नाही. करोना दरम्यान घरातच मनोरंजन करणाऱ्या बच्चे कंपनी आता मैदानी खेळाकडे वळत आहेत.मात्र त्यांना हक्काचे मिळालेले मैदानात ही वाहनांचा गराडा असल्याने मैदानी खेळ खेळता येत नाहीत. काहीवेळा तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना अडचणी येतात. काही वेळा मैदानात पार्क केलेले वाहनचालक मुलांना गाडी काही झाले तर असे बोलून दमदाटी करत असतात.यामुळे कित्येकदा येथे भांडणाचे प्रकार सुद्धा घडत आहेत.

हेही वाचा… नवी मुंबईकरांनो पाण्याचा वापर जपून करा, गतवर्षीपेक्षा मोरबे धरणात कमी पाणीसाठा

सिडकोच्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वेगळी वाहन पार्किंची व्यवस्था नाही. सिडको वसाहतीत मोठे इमले तयार झाले असून परिणामी आर्थिक सुबत्ता वाढून वाहन संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काही वाहने रस्त्याच्या दुतर्फा तर काही वाहने अशा मैदानामध्ये उभी केली जात आहेत. या विभातील क्रीडांगण या अतिक्रमणातून मुक्त होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा… कळंबोलीत लाखो लीटर पिण्याच्या पाण्याची नासाडी

कोपरखैरणे से.१ ते ४ या ठिकाणच्या मैदानात ही असेच वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात होते. मात्र त्याठिकाणी आता मैदानात केवळ नागरिकच जाऊ शकतील अशी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेव्हा इतर मैदानातही अशी व्यवस्था व्हावी अशी मागणी होत आहे. कोपरखैरणे विभागात प्रत्येक एकूण ४ सेक्टरसाठी एक सामायिक उद्यान आणि क्रीडांगण उपलब्ध आहे. मात्र या विभागातील मैदानांवर मैदानी खेळापेक्षा वाहनांची संख्या जास्त दिसते. दिवसेंदिवस याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनतळाचे स्वरूप येत आहे. त्यामुळे येथील मुले मैदानी खेळापासून वंचित राहत आहेत. या अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kopar khairane encroachment of vehicles on the playground asj