नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो आणि मटारची आवक कमी होत असून दर वधारले आहेत. मागील एक महिन्यापासून टोमॅटो दर आवाक्यात होते परंतु टोमॅटोच्या दराने पुन्हा उसळी घेतली असून प्रतिकिलो चाळीशी गाठली आहे. हिरव्या वाटाण्याच्या दरातही वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलत्या वातावरणाने टोमॅटोच्या दर्जावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर परतीच्या पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याने बाजारात सध्या आवक कमी होत असून त्यामुळे दरात वाढ झाली आहे. बाजारात २८ गाड्यांद्वारे १४६८ क्विंटल टोमॅटो आवक झाली आहे. दरात प्रतिकिलो १०-१२ रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी घाऊक बाजारात प्रतिकिलो ४० रुपयांनी विक्री झाली आहे. मागील काही दिवसांपासून मटार म्हणजेच मटारचे दर आवाक्यात आले होते, परंतु मंगळवारी पुन्हा घाऊक बाजारात वाटाण्याची आवक घटल्याने दरात प्रतिकिलो १५-२० रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात आधी प्रतिकिलो ६५-७० रुपयांनी उपलब्ध असलेला वाटाणा आता ८०-९० रुपयांनी विक्री होत आहे.

हेही वाचा…हजार कोटींच्या करवसुलीचे पालिकेपुढे आव्हान सहा महिन्यांनंतर ३५० कोटींची करवसुली

मटारचीही आवक कमी आहे. मंगळवारी २० गाड्यांमधून ९३५ क्विंटल वाटाणा दाखल झाला आहे. राज्यातील सातारा ,नाशिक येथील वाटाणा दाखल होत आहे तर परराज्यातील आवक कमी झाली आहे. पावसामुळे उत्पादन कमी त्यात वातावरण बदलाचा फटका बसत असल्याने आवक कमी होत आहे. तसेच हिरव्या वाटाण्याला ज्याठिकाणी अधिक बाजारभाव आहे त्याठिकाणी त्याचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे ही एपीएमसीत आवक रोडावली आहे. यंदा मटारचे उत्पादन आणि आवक कमीच असेल अशी माहिती व्यापारी बाळासाहेब बडदे यांनी दिली.

हेही वाचा…बेटासाठी नव्या रस्त्याचा खटाटोप नवी मुंबईतील पाणथळी, सीआरझेड, तिवरांच्या जंगलातून रस्त्यांची बांधणी?

यंदा मटारचे उत्पादन कमीच

एपीएमसीत डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात हिरवा वाटाणा दाखल होण्यास सुरुवात होत असते, शिवाय डिसेंबरमध्ये वाटण्याचा खरा हंगाम सुरू होतो तर वर्षभर तुरळक वाटाणा दाखल होत असतो. बाजार समितीत राज्यातील आणि मध्य प्रदेशातून मटारची आवक होते. मात्र सध्या परतीच्या पावसामुळे वाटणाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमीच आहे.

पावसामुळे उत्पादन कमी त्यात वातावरण बदलाचा फटका टोमॅटो आणि मटार पिकांना बसला आहे. परिणामी आवक घटून दर वाढले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai agricultural produce market committee arrival of tomatoes and peas is decreasing and prices have increased sud 02