नवी मुंबई: नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे माणुसकी शून्यता आणि अज्ञात व्यक्ती विषयी माणुसकी हे टोकाचे स्वभाव एकाच घटनेतून समोर आले आहेत. दुचाकीने महिलेस धडक देऊन एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र या घटनेची काहीही माहिती नसताना बेवारस अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या महिलेस एका रिक्षा चालकाने रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. अपघात बाबत शंका आल्याने पोलिसांनी केलेल्या तपासात दुचाकी स्वाराने या महिलेस धडक देऊन गेल्याचे समोर आले. त्या दुचाकी स्वाराचा शोध पोलीस घेत आहेत.
कोपरखैरणे जिमी टॉवर समोर एक महिला भोवळ येऊन पडली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बिपीन तूतुरववाड आणि पोलीस नाईक देविदास भोई हे घटनास्थळी गेले. मात्र तेथे गेल्यावर उपस्थित लोकांनी सदर महिलेस एका रिक्षा चालकाने मनपा रुग्णालय वाशी या ठिकाणी घेऊन गेल्याचे सांगितले.
हेही वाचा… विना परवाना वृक्षतोड करणाऱ्यांना उद्यान विभाग पाठीशी घालत आहे का?
रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता तो पर्यंत महिले कडील कागदपत्रांवरून तिची ओळख पटली होती. व डॉक्टरांनी याबाबत तिच्या नातेवाईकांना कळवळ्याने तेही उपस्थित झाले होते. तिचे नाव नंदा खताते वय ७४ असे होते तर तिचा पुतण्या श्रीपाद हा त्याठिकाणी आले होते. सदर घटनेची पोलिसांनी नोंद केली व निघून गेले. मात्र दुसऱ्याच दिवशी सदर महिला उपचारादरम्यान मृत झाल्याची माहिती रुग्णालयाने कोपरखैरणे पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली.
हेही वाचा… गणेशोत्सवापूर्वी जासई उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार; पुलावरील एक मार्गिका सुरू करणार
मात्र ही महिला नेमकी कशामुळे रस्त्यात पडली याचा तपास सुरु ठेवण्यात आला. पोलिसांनी जेव्हा रिक्षा चालकाचा शोध घेतला त्यावेळी त्याचे नाव प्रकाश कांबळे असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या कडूनही माहिती घेतली. शेवटी घटनस्थाला समोर असलेल्या एका खाजगी इमारती बाहेर सीसीटीव्ही असल्याचे समोर येताच त्याच्या फुटेजची पाहणी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज मध्ये घटनेचा पूर्ण उलगडा झाला. त्यानुसार घटनेच्या दिवशी सदर वृद्ध महिला रस्त्यावरून पायी जात असताना ज्ञान विकास हायस्कुलच्या दिशेने एक भरधाव वेगात दुचाकी स्वार तीनटाकीच्या दिशेने जात असताना त्याने सदर महिलेस जोरदार धडक दिली मात्र त्याच वेळी त्याने स्वतःला सावरत दुचाकी सह पळून गेल्याचे स्पष्ट झाले. कोपरखैरणे पोलीस त्या दुचाकी स्वाराचा शोध घेत आहेत.
हेही वाचा… उरण मध्ये गुरुवारी पावसाला सुरुवात, जोर मात्र कमीच; नागरिकांची अनेक दिवसांच्या उकाड्यापासून सुटका
दुचाकी स्वाराने धडक दिल्यावर ७४ वर्षांची महिला खाली पडली मात्र हे पाहून त्याकडे दुर्लक्ष करून तो पळून गेला मात्र कुठलीही ओळख नसताना रिक्षा चालक प्रकाश कांबळे याने सदर महिलेस स्वतःच्या रिक्षातून रुग्णालयात पोहचवले.