नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथे डॉ. डी .वाय. पाटील रुग्णालय समोर एका रुग्णवाहिका मदतनिसला चौघांनी गाडीतून खाली खेचून बाहेर काढले. एवढ्यावरच न थांबता त्याला बांबूने बेदम मारहाण केली शेवटी चाकूचे सपासप वार केले. रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यावर चालकाच्या मानेत खुपसलेला चाकू तशाच अवस्थेत टाकून आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आज सकाळी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
युवराज अंजमेंद्र सिह असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो रुग्णवाहिकेवर मदतनीस आणि वेळप्रसंगी चालकाचे काम करत होता. रविवारी रात्री साडेआठ पावणे नऊच्या सुमारास नेरुळ येथील डॉ. डी वाय. पाटील रुग्णालय समोर रुग्णवाहिका पार्क करण्यासाठी चालक ज्ञानेश्वर नाकाडे हे घेऊन येत होता. त्यावेळी त्याच्या समवेत युवराज हि होता. गाडी पार्क करण्यापूर्वीच अचानक चार अनोळखी व्यक्तींनी रुग्णवाहिका असलेली. त्यातील एकाने युवराज यांना खेचून बाहेर काढले. दुसर्याने बांबूने बेछूट मारणे सुरु केले. तिसऱ्याने रुग्णवाहिकेची नासधूस केली. मात्र ज्ञानेश्वर यांनी तशीच गाडी पुढे नेली.
हेही वाचा : नवी मुंबईतील उद्धव ठाकरे गटाचे नेते पवारांच्या भेटीला
इकडे गाडी खाली खेचून बाहेर काढलेल्या युवराज याच्यावर चौघांनी हल्ला चढवत बेदम मारहाण केली तर त्यातील एकाने चाकूचे वार केले. त्यात त्याच्या पोटात, हातावर दिसेल तेथे वार केले त्यात त्याच्या मानेत चाकू खुपसला. तेथेच युवराज कोसळला. तो मयत झाल्याची खात्री पटताच चौघेही पळून गेले. घटनेबाबत चालक ज्ञानेश्वर यांनी रुग्णवाहिका मालक सिध्देश्वर चितळकर आणि नेरुळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवराज याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. हत्या का केली ? याबाबत अद्याप ठोस कारण समोर आले नाही पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली.