नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरी गाव परिसरात एम.डी. हा अंमली पदार्थ विकताना एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून हि कारवाई एपीएमसी पोलिसांनी केली आहे. सोएब मोहम्मद सलीम अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोपरीगाव सेक्टर २६ येथे हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूस एक इसम संशयास्पद वावरताना पोलीस हवालदार सुनील पाटील यांना आढळून आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विविध वेबसाईटवरील टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक, चार्टर्ड अकाउंटंट आरोपीला अटक

त्याची चौकशी केली असता त्याच्या बॅगेत ५ लाख १० हजार रुपये किंमतीचे एमडी व तसेच १ हजार २०० रुपये रोख रक्कम आढळून आल्याने आरोपी सोएब मोहम्मद सलीम अन्सारी (वय २१ वर्ष रा. गोवंडी) याला ताब्यात घेतले असून सदरचे अमली पदार्थ त्याने कुठून आणले व कोणाला विकणार याचा तपास तुर्भे एपीएमसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिउरकर करत आहेत, अशी माहिती एपीएमसी पोलिसांनी दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai apmc police arrested a person who was trying to sell mephedrone drugs and seized drugs of rupees 5 lakhs css