नवी मुंबई : मार्च महिन्यांपासून डाळी, कडधान्यांच्या दरात वाढ होत आहे. यंदा पावसाने दडी मारली आहे. समाधानकारक पाऊस पडत नसल्याने आगामी कलावधीत उत्पादन घटण्याची शक्यता आहे. डाळी,कडधान्ये सहित आता रोजच्या जेवणात लागणाऱ्या तांदळाने देखील उसळी घेतली आहे. एपीएमसी घाऊक बाजारात डाळी, तांदूळ, ज्वारीचे दर कडाडले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ९% ते १५% दरवाढ झाली आहे. तूरडाळ १२५ रुपयांवरून १३५ रुपये ,ज्वारी ४१ रुपयांवरून ४६ रुपये तर तांदूळ ८ ते १० रुपयांनी वधारले असून बासमती तांदूळाचे भाव देखील १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशीतील एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात. दक्षिण भारतातून सर्वाधिक तांदळाची आवक होते. तसेच राज्यातून कोलम तांदूळ दाखल होतो. उत्तर भारतातून बासमती तांदूळ येतो. जूनमध्ये दाखल झालेल्या पावसाने सप्टेंबर महिना उजाडला तरी दडी मारली आहे. ऐन लागवडीत समाधानकारक पाऊस नसल्याने उत्पादन घटणार आहे. त्यामुळे ही शक्यता लक्षात घेता डाळी, तांदुळाची साठवणूक होत असून बाजारातील आवक घटली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे . बाजारात २५० ते ३०० गाड्या तांदळाच्या आवक होतात. मात्र त्यात ३० % घट झाली असून आवक २०० गाड्या आवक होत आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे. एकूण १७१९० क्विंटल तांदूळ आवक असून प्रतिकिलो ४७-१००रुपयांवरून आता ७४-१२०रुपये दर आहेत.

हेही वाचा : पनवेलमध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी २० कृत्रिम तलाव, ९३ लाख रुपये खर्चाचे नियोजन

कोलम तांदूळ ८ ते १० रुपयांनी तर बासमती तांदूळ १५ ते २० रुपयांनी महाग झाला आहे. इतर तांदळाच्या दरात देखील तुरळक वाढ झाली आहे. तांदळाच्या कोलम,इंद्रायणी,स्टीम बासमती अशा अनेक जाती आहेत. ज्वारी २२३४ क्विंटल दाखल होत असून ४१ रुपयांनी उपलब्ध होती, ती आता ४६ रुपये, ४००५ क्विंटल तूरडाळ आवक असून १२५ रुपयांवरून १३५ रुपये तर किरकोळ बाजारात १८० रुपयांनी विक्री होत आहे. पुढील काळात बाजारात अशीच आवक घटली तर गणेशोत्सव , नवरात्रोत्सव दरम्यान दर आणखी वधारण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा : नवी मुंबईतही वृक्षांना काँक्रीटचा वेढा; बेलापूर, सीवुड्स, वंडर्स पार्क परिसरांतील अनेक झाडांचे बळी, महापालिकेचा कानाडोळा

‘यंदा समाधानकार पाऊस पडत नसल्याने आगामी कालावधीत डाळी, कडधान्ये उत्पादन घटणार आहे. त्यामुळे आतापासूनच एपीएमसी बाजारात डाळी, धान्याची कमतरता भासत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे डाळी, तांदूळ आणि ज्वारीच्या दरात वाढ झाली आहे. पुढील कालावधीत आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे’, असे धान्य बाजार समितीचे संचालक निलेश विरा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : सिडकोच्या उरणमधील तिन्ही रेल्वे पुलांवर विजेचा लपंडाव, प्रवाशांचा अंधारातून धोकादायक प्रवास

घाऊक दर

धान्य ऑगस्ट सप्टेंबर दरवाढ %
ज्वारी ४१-४२ ४६ १०%
तांदूळ ४७-१० ७४-१२० १०%
चणाडाळ ७० ७५ ७%
चणा ६२ ७१ १५%
तुरडाळ १२५ १३५ ९%
मसुरडाळ ७५ ७८ ४%
मुगडाळ ९७-१०० १०६-१०८ १०%

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai apmc prices of pulses rice jowar increased by 9 to 15 percent compare to august month css