नवी मुंबई : तुमचा मोबाईल चोरी झाल्यावर काय अवस्था होते हे सांगण्याची गरज नाही. मात्र मोबाईल चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यासाठी तुम्ही गेला आणि … पोलिसांनी सांगितले तुमचा मोबाईल चोरणारा अटक झाला असून कायदेशीर प्रक्रिया करून मोबाईल घेऊन जा. तर गगन ठेंगणे म्हणजे काय याचा अनुभव येईल. असाच अनुभव अहमदनगर येथे राहणाऱ्या व्यक्तीला एपीएमसी पोलीस ठाण्यात आला आहे. 

सोपान दत्तू फापाळें असे त्या नशीबवान फिर्यादीचे नाव आहे. सोपान हे बदली वाहन चालक असून ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणाऱ्या लिंगदेव खेड्यात राहतात. १ ऑगस्ट रोजी ते फ्लावर भाजीचा ट्रक घेऊन नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. ट्रक रिकामा केल्यावर काही वेळ आराम केला. नेमके याच वेळेस त्यांच्या खिशातील मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरी केला. मात्र तो पर्यंत परत जाण्याची वेळ झाल्याने ते ट्रक घेऊन गावी गेले. ते गावी असताना एपीएमसी पोलिसांनी तीन मोबाईल चोरांना अटक केले असून अनेक मोबाईल जप्त केल्याची बातमी त्यांच्या वाचनात आली.

Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक

हेही वाचा : उरण : खारकोपर लोकलवरील गव्हाण स्थानक अपूर्णच; काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागणार

सुदैवाने त्यांना ३० तारखेला त्यांना पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सीताफळ पोहोचवण्याचे काम आले. त्यानुसार ते सीताफळ घेऊन आले आणि माल उतरवल्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना जप्त केलेले मोबाईल दाखवले आणि त्यात सोपान यांना आपला मोबाईल दिसला. मात्र तो लगेच त्यांना देण्यात तांत्रिक अडचण असल्याने प्रथम गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी सांगितले कि काही दिवसापूर्वी अमोल पाटील, अनिकेत पाटील आणि विनायक मोरे या तीन मोबाईल चोरांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून अनेक मोबाईल जप्त करण्यात आले. त्यात सोपान यांचाही मोबाईल आहे. यात न्यायालायने निर्देश दिल्याप्रमाणे तांत्रिक बाब तपासून सर्वांना मोबाईल परत देण्याची प्रक्रिया सुरु आहे.