नवी मुंबई: नवी मुंबई शहरातील बेलापूर विभागात शहाबाज गावात शनिवारी इंदिरा निवास ही बेकायदा अनधिकृत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा बळी गेला असून याच इमारतीच्या विकासकाने दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या काही अंतरावरच बेकायदा गाळे उभारले होते त्याच्यावर आज पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत बेकायदा गाळे जमीनदोस्त केले .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीमधील ५२ जण सुखरूप बाहेर पडले तर ३ जणांचा मृत्यू झाला होता. आज रविवारी सकाळपासूनच महापालिकेच्यामार्फत दुर्घटनाग्रस्त इमारतीचा मलबा हटवण्याचे काम महापालिकेचे उपायुक्त सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणात सुरू करण्यात आले होते. दुर्घटनाग्रस्त इमारतीत अनेकांचा संसार ढीगाऱ्याखाली गेल्यामुळे दुर्घटनाग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित होते. ढिगार्‍याखाली गॅस सिलेंडरही असल्यामुळे पालिकेच्यावतीने अत्यंत सावधगिरीने मलबा हटवण्याचे काम करण्यात आले. यावेळी दुर्घटनाग्रस्त नागरिकांना आपल्या संसाराची माती झाल्याचे पाहून अश्रूही अनावर झाले होते.

हेही वाचा : Video: वाशीत हिट अँड रन प्रकरण…भर वस्तीत गाडी शिकवणे रिक्षा चालकाच्या जीवावर बेतले; दोघांना अटक 

नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागाच्या मदतीने मलबा बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. दुर्घटनाग्रस्त नागरिकांनी आपल्या नातेवाईकांच्या तसेच नवी मुंबई महापालिकेच्या रात्र निवारा केंद्रात आसरा घेतला आहे. शनिवारी घडलेल्या दुर्घटनेत बेकायदा इमारतीचा विकासक महेश कुंभार व शरद वाघमारे यांच्यावर पालिकेच्या वतीने बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी याच दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारीच याच इमारतीच्या विकासकाने बेकायदा गाळे बांधले होते त्याच्यावरही पालिकेने तोडक कारवाई केली आहे.

हेही वाचा : तुमच्या बापाला हरवले आहे – आमदार मंदा म्हात्रे; नवी मुंबई भाजपमध्ये गृहकलह? 

शहाबाज गावातील दुर्घटनेतील चार मजली इमारत अनधिकृत असून इमारतीला महापालिकेच्या वतीने २०११ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. महेश कुंभार या विकासकामार्फत ही बेकायदा इमारत उभी करण्यात आली होती. जमीन मालक शरद वाघमारे यांच्या जागेवर ही इमारत उभी राहिली होती. आज इमारती शेजारी याच विकासकाने बेकायदा व्यवसायिक गाळे उभारले होते त्याच्यावरही तोडक कारवाई करण्यात आली आहे.

शशिकांत तांडेल अतिरिक्त आयुक्त बेलापूर विभाग
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai at shahabaj village illegal shops of builder demolished css