नवी मुंबई: वाशी सेक्टर ९ येथे कार आणि रिक्षाच्या अपघातात रिक्षा चालकाला आपला जीव गमवावा लागला. गाडी चालक स्वतःच्या एका मित्राला भर वस्तीत गाडी शिकवताना नवशिक्या वाहन चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटले आणि गाडीने एका रिक्षाला जोरदार धडक देत पुढे जाऊन एका भिंतीवर एवढी जोरदार गाडी धडकली कि ती भिंत पडली. या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुभांश शुक्ला आणि भागवत तिवारी असे यातील आरोपींची नावे आहेत तर मुन्नालाल गुप्ता असे अपघातात मयत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. शनिवारी झालेला हा अपघात एवढा भीषण होता कि कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले शिवाय जे एन ४ या सिडकोच्या रहिवासी संकुलाची कंपाउंड भिंत पडली. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघात झाल्यावर गाडी चालवणारा शुभांश हा पळून गेला मात्र उपस्थित नागरिकांनी भागवत तिवारी याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तिवारी यांने दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी कोपरखैरणे येथील शुभांश याला ताब्यात घेतले. 

हेही वाचा : तुमच्या बापाला हरवले आहे – आमदार मंदा म्हात्रे; नवी मुंबई भाजपमध्ये गृहकलह? 

दोघांच्या ताब्यात घेत चौकशी केली असता तिवारी हा कार चालक असून शुभांश हा त्याचा मित्र आहे. शुभांश याला गाडी चालवता येत नसल्याने तिवारी कार शिकवत होता. मात्र भर वस्तीत शुभांश याचा कार वरील ताबा सुटला आणि त्याने गाडी भरघाव वेगात जात असताना मुन्नालाल यांच्या रिक्षाला धडकली होती, अपघातास गाडी शिकणारा कारण असून भर वस्तीत गाडी शिकवण्यासाठी बेजबाबदार पणे गाडी हातात दिल्याने झालेल्या अपघात मरण पावलेल्या व्यक्तीच्या मरणाला दोषी धरत तिवारी आणि शुभांश या दोघांच्या विरोधात वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सदर गुन्हा घडल्या नंतर वाशी पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र याबाबत अधिक ओरड झाल्याने त्यात सध्या बेजबाबदार पणे गाडी चालवल्याने होणारे मृत्यू कडे गांभीर्याने पहिले जात असल्याने पोलिसांनी रात्री उशिरा याबाबत गुन्हा नोंद केला आहे. आरोपींची आरोग्य तपासणी केली असून त्यांनी मद्य प्राशन केलेले नव्हते अशी माहिती वाशी पोलिसांनी दिली आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai at vashi sector 9 area auto rickshaw driver died on the spot in car accident hit and run case css