नवी मुंबई: लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून चार जून रोजी मतमोजणी होत आहे. मुंबईतील शिवडी आणि दक्षिण मुंबई मतदार संघाची मतमोजणी शिवडी बंदर परिसरात होणार आहे. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मंगळवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत अटल सेतू वाहतूक जड अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे तर हलक्या वाहनांची वाहतूक सुरु असली तरी त्यांना शिवडी येथे थांबता येणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडाळा वाहतूक विभागाच्या हद्दीत शिवडी वेअर हाऊस, हे बंदर रोड, शिवडी पुर्व मुंबई येथे ३१ दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ व ३० दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचा स्ट्रॉग रूम आहे. चार जून रोजी या ठिकाणी मत मोजणी असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अटल सेतू शिवडी बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झिाट) येथे कोणत्याही प्रकारची अवजड वाहने तसेच माल वाहतूककरणारी वाहने यांना अटल सेतू दक्षिण वाहिनी येथून येण्यास मनाई करण्यात आली आहे. या  मार्गावर हलकी वाहने येण्यास परवानगी असेल. परंतु, त्यांना शिवडी एक्झीट येथे उतरण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांना थेट कुलाबा एक्झीट व वडाळा एक्झीट येथून पर्यायी मार्गाने वाहतूक करण्यास परवानगी आहे. त्यावेळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला मार्ग मंगळवारी चार जून  रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा दरम्यान बंद असणार आहे. 

हेही वाचा : पनवेल: बहिणीसोबत एकटा घरात दिसल्याने त्याला ठार केले, तळोजातील घटना

नवी मुंबई एमटीएनएल दक्षिण वाहिनी ते शिवडी बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अवजड वाहनासाठी पर्यायी मार्ग नवी मुंबई वाशी खाडी पूल मार्गे तर हलकी वाहनासाठी पर्यायी मार्ग – कुलाबा बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) व वडाळा बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) असणार आहे. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसुचना ही इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस वाहने, अग्निशमन बंब , रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai atal setu closed for heavy vehicles on 4th june lok sabha vote counting day css