नवी मुंबई : माझ्या नादाला लागू नका, तुमच्या बापाला मी हरवले आहे. बेलापूरचा मतदार टक्केवारी घेणाऱ्याला निवडून देणार नाही. माझ्या नादाला लागू नका असा इशारा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला. आ. म्हात्रे यांनी कोणाचे नाव जरी घेतले नाही तरी भाजप मधून बेलापूर मध्ये आमदारकीला इच्छुक असणाऱ्या संदीप नाईक यांना दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नेरुळ सेक्टर १० येथील एका उद्घाटन कार्यक्रम वेळी केलेल्या भाषणात आमदार म्हात्रे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेरुळ येथील सेक्टर १० मध्ये भाजपच्या वतीने शुक्रवारी सीसीटीव्ही उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बेधडक भाषण केले. आपल्या भाषणात  कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख कोणाकडे आहे हे उघड सत्य आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वपक्षाच्याच स्थानिक नेत्यांना नाव न घेता इशारा दिला आहे. 

हेही वाचा : भव्य जनआक्रोश मूक मोर्चा, पीडित महिलेचा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करा… 

मी आमदार असल्याने या मतदारसंघाच्या उमेदवारीवर माझाच  अधिकार आहे. सध्या काही जण बेलापूरमधून आमदार होण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र त्या स्वप्न बघणार्‍यांना मी सांगू इच्छिते, तुमच्या बापाला मी हरवून बसले आहे. माझ्या नादाला लागू नका. जो माझ्या नादाला लागतो, त्याचा नाद मी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. झाला आहे.या मतदारसंघाचे गेल्या दहा वर्षांपासून मी नेतृत्व करीत आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांच्याकडून संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. दहा वर्षे मात्र ते गाढ झोपेत होते.असे आमदार म्हात्रे यांनी भाषणात बोलल्याने अनेकांच्या  भुवया उंचावल्या. तसेच बेलापूरमध्ये मी काय कायम आमदार राहणार नाही. मी जरी उमेदवारी घेतली नाही, तरी कमिशन खाणार्‍यांचे नाव मी उमेदवारीसाठी सुचवणार नाही. बांधकाम व्यावसायिकांना, कंत्राटदारांना त्रास देणार्‍या नेत्यांना नागरिक स्वीकारणार नाहीत. बेलापूरचा उमेदवार चारित्र्यवान हवा, असेही त्या म्हणाल्या. 

हेही वाचा : तिहेरी हत्याकांडाच्या चौकशीअंती डॉ. पोळ यांना अटक

आमदार म्हात्रे आणि गणेश नाईक यांचे राजकीय वैर नवी मुंबईकरांसाठी नवीन नाही. मात्र त्यामुळे राज्य पातळीवरील भाजप श्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे विजय नाहटा यांचे नावे आघाडीवर आहेत . 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai bjp mla manda mhatre on sandeep naik belapur assembly elections css