नवी मुंबई: “तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे? भारतात कि पाकिस्तानात? फिर एक बार मोदी सरकार”,  भारतीय जनता पार्टीची हि जाहिरात वादग्रस्त ठरत आहे. हीच जाहिरात प्रसिद्ध करताना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातील एका प्रतिथयश वर्तमानपत्राच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा :  उरण मार्गावरील स्थानकांत गैरसोयी; चार महिन्यांपासून विविध रेल्वे स्थानकांत पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही सुविधांचा अभाव

निवडणूकविषयक जाहिरात प्रसिद्ध करताना निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. मात्र अशा नियमांचा भंग करून जाहिरात प्रसिद्ध केल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे कसोशीने प्रयत्न यंत्रणा करीत आहे. राज्यातील एका प्रतिथयश दैनिकाने ५ तारखेला भारतीय जनता पार्टीची  “तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे? भारतात कि पाकिस्तानात? फिर एक बार मोदी सरकार”  ही जाहिरात पहिल्या पानावर छापली. मात्र सदर जाहिरातीच्या खाली प्रकाशक व मुद्रक यांचे नाव प्रसिद्ध करणे बंधनकारक असतानाही केले नाही. त्यामुळे त्या वर्तमानपत्राचे मुद्रक यांच्याविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून  लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम १२७ (अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 