नवी मुंबई: नरेंद्र मोदी यांची देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड झाली असून याचा जल्लोष नवी मुंबई भाजपा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. संगीताच्या तालावर कार्यकर्त्यांनी नृत्यही केले. शिवाजी चौक यावेळी भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यांनी बहरून गेला होता. यावेळी प्रतिक्रिया देताना माजी खासदार संजीव नाईक यांनी मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असून देशाची सेवा करण्यास सज्ज झाल्याचे सांगितले. आगामी पाच वर्षांमध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी काम सुरू होईल. मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार आपल्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुढील पाच वर्षांची पायाभरणी देखील करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Counting of votes in Panvel under tight police security
कडेकोट बंदोबस्तात पनवेलची मतमोजणी
CIDCO began demolishing unauthorized construction on Pargaon hill in Panvel from Thursday morning
पारगाव येथील वादग्रस्त बांधकामावर सिडकोचा हाताेडा
Swaraj Party alleged supporters of BJP candidate Ganesh Naik distributed money in Shankar Mores office
पैसे वाटप संशयावरून कोपरखैरणेत हाणामारी 
Assembly Elections 2024 Passengers Crowd in Panvel Bus Stand
गावकडील मतदान करावे कसे, पनवेल बस आगारात प्रवाशांची गर्दी 
Assembly election 2024 Voters from Navi Mumbai to village for polling
मतदार निघाले गावाला… राहण्यास नवी मुंबई मतदानाला गाव…
facility of mobile lockers outside the polling booth is provided by the Election Commission itself to store mobile phones navi Mumbai
यंदा मतदान केंद्रावर मोबाईल वरून वादावादी बंद…
cm eknath shinde warning to those supporting rebels in Belapur appeals to make Manda Mhatre winner
बेलापुरात बंडखोरांना साथ देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी, मंदा म्हात्रे यांनाच विजयी करण्याचे आवाहन
drugs seized in taloja by navi mumbai police
तळोजात साडेपाच कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; नवी मुंबई पोलीसांची कारवाई
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 

हेही वाचा : पनवेलमधील महिलेची ऑनलाईन साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक

लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार विरोधकांनी केला. मोदीजींचे सरकार पुन्हा येणार नाही असा दावा विरोधक करत होते. परंतु तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार आहे, असे सांगून विरोधक आरोप करीत राहतील, सत्ताधारी म्हणून जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याचं काम आम्ही करू. लोकसभा निवडणुकीत राहिलेल्या उणिवा दूर करून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश प्राप्त करू. असा विश्वास संजीव नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. आनंदोत्सवामध्ये अनंत सुतार, रवींद्र इथापे, दशरथ भगत माधुरी सुतार, नेत्रा शिर्के, नवीन गवते, अमित मढवी, अरुण पडते यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.