नवी मुंबई : वाशीत शाळकरी मुलींची छेड काढल्याप्रकरणी एका २५ वर्षीय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवानाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने अशाच पद्धतीने अनेक शाळकरी मुलींची छेड काढल्याचे समोर आले आहे. सूरज कुमार जगत राम असे आरोपीचे नाव आहे. तो मूळ काश्मीर येथील रहिवासी व मुंबईत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात शिपाई म्हणून नोकरी करत आहे. गेल्या आठवड्यात त्याने एका शाळकरी मुलीची छेड काढली आणि निघून गेला होता. या बाबत पीडित मुलीने तिच्या पालकांना माहिती दिली होती. दोन दिवसांच्या पूर्वी पीडिता आपल्या पालकांच्या समवेत बाजारात गेली असता त्याठिकाणी आरोपीही फिरत होता. त्यावेळी पीडितेने त्याला ओळखले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा