नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथील एका बस थांब्यावर बसची वाट पाहणाऱ्या एका तरुणीवर अनोळखी व्यक्तीने जीवघेणा हल्ला होता. पोलिसांनी हल्लेखोराला अर्ध्या तासाच्या आत गजाआडही केले. याबाबत लोकसत्ताने वृत्तही दिले होते. मात्र या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले ज्यात त्या तरुणीवर हल्ला होत असताना एकही व्यक्ती तिला वाचवण्यास समोर आली नाही. त्यामुळे आपण कोणावर विसंबून न राहता कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यास सक्षम रहा. असाच अनुभव पीडित तरुणीने घेतला.
ऐरोलीत राहणारी निशा कुंभार ही नेरुळ येथील एका महाविद्यालयात सेमिस्टर परीक्षेसाठी काही दिवसांपूर्वी आली होती . त्यावेळी परत घरी जाण्यासाठी जवळच्या बस थांब्यावर बसची वाट पाहत मैत्रिणीसमवेत थांबली असता तिच्यावर हुसेन इमाम हसन शमशु या व्यक्तीने बिअरच्या बाटलीने हल्ला केला .आरोपीने फुटलेली बातमी निशाच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वार निशाणे वाचवला. मात्र कमरेला मोठी दुखापत झाली. विशेष म्हणजे हे होत असताना तिच्या आसपास किमान दहा ते पंधरा लोक होते त्यात युवकांची संख्या जास्त होती तरीही तिला वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. अपवाद तिच्या मैत्रिणीने थोडा बहुत प्रयत्न केला मात्र तीही घाबरली होती. अशा वेळेस कोणी मदतीस येणे गरजेचे होते. याचे सीसीटीव्ही फुटेज नुकतेच समोर आले त्यात हा सर्व घटनाक्रम दिसून येत आहे.
हेही वाचा : उरण : समुद्राच्या ओहोटीमुळे मोरा – मुंबई जलप्रवासात खंड, काही तासांसाठी प्रवास ठप्प होणार
एवढे लोक असून कोणीही हल्लेखोरापासून तिला वाचवण्याचा प्रयत्न न केल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. अशा वेळी नागरिकांनी सावधपणे एकत्रित धाडस केले असते तर हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली नसती. घटनेवेळी पोलीस असतातच असे नाही ही तांत्रिक बाजू समजणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणच खास करून तरुणींनी स्वतःला शारीरिक सक्षम करणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.