नवी मुंबई : ठाणे-बेलापूर महामार्गावर दोन ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येत आहे. तुर्भे उड्डाणपुलाचे काम फेब्रुवारीपर्यंत चालणार असून आता घणसोली येथील उड्डाणपुलाचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे हे या पुलावरील एक मार्गिका बंद राहणार आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपासून तुर्भे स्टेशन समोरील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आल्याने वजड वाहनांना पावणे पासून कळंबोलीच्या दिशेने जाण्यासाठी एमआयएडीसी अंतर्गत रस्ते मार्गाने इंदिरानगर पर्यंत जावे लागत आहे. त्यातच आता घणसोली उड्डाणपुलाचे काँक्रीटीकरण काम सुरू करण्यात आले आहे. एक तर शिळफाटा परिसरातील वाहतूक वाढली त्यात आता घणसोली उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरण काम सुरू केल्याने वाहनांच्या गतीला ब्रेक लागला आहे.
हेही वाचा : पनवेलमध्ये हलगर्जी करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल
उड्डाणपुलावरील काम चालू असल्याच्या कालावधीत अंडरपास दिवसा बंद केल्यास, बेलापूरकडे जाणाऱ्या वाहनास ठाणे-बेलापूर रोडवर जायचे असल्यास ती वाहने महापे पुलाखालून यु टर्न घेऊन बेलापूर ठाणे रोडवर येतील, तसेच बेलापूर ठाणे रोडवरील वाहनास जर ठाणे बेलापुर दिशेकडे जायचे असल्यास त्यांनी रिलायन्स उड्डाणपुलाखालून यु टर्न घेऊन ती वाहने ठाणे-बेलापूर मार्गावर येऊ शकतील.
घणसोली उड्डाणपुलाचे काँकिटीकरण करण्याचे कामाचे दरम्यान काम पूर्ण होईपर्यंत वाहनांसाठी भुयारी मार्ग दिवसा पूर्णत: बंद करण्यात येत आहे. याला पर्यायी मार्ग म्हणून महापे पुलाखालून यु टर्न घेऊन बेलापूरर ठाणे रोड मार्गे वाहने इच्छीत स्थळी जातील. तसेच बेलापूरकडे जायचे असल्यास त्यांनी रिलायन्स पुलाखालून यु टर्न घेवून वाहनांना इच्छीत स्थळी जाता येईल.
हेही वाचा : VIDEO : कोणावर विसंबून राहू नका, स्वतःच सक्षम बना; तरुणीवर हल्ला, लोकांनी घेतली फक्त बघ्याची भूमिका
घणसोली उड्डाणपूल येथे महानगरपालिकेमार्फत काँकिटीकरण करण्यात येणार असून, त्याकरीता उड्डाणपुलाची प्रथम एक मार्गिका बंद करून व त्यानंतर दोन्ही मार्गिका तसेच उड्डाणपुलाखालील खालील अंडरपास बंद करून वाहतुक कोंडी किती होते काय याचा आढावा घेतला गेला. त्यावेळी दोन्ही मार्गिका बंद व अंडरपास बंद केल्यास वाहतुकी करीता बाजुच्या दोन मार्गिका तसेच सेवा रस्ता वरील दोन मार्गिका उपलब्ध होत असल्याचे दिसुन आले. तसेच वाहतुक सुरळीतपणे बेलापुर दिशेकडे मार्गस्थ होत असल्याचे दिसून आले. असा निष्कर्ष काढण्यात आला असा दावा वाहतूक विभागाने केला आहे.