नवी मुंबई : आयकर विभागाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून आरोपीने एका व्यक्तीला फोन केला व त्याला धाड टाकेल, विदेशात संबंध उजेडात आणेल अशा धमक्या देत २१ लाख २२ हजार ८०० रुपयांची फसवणूक केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी एकदाही फिर्यादींना प्रत्यक्ष भेटला नाही. केवळ फोनवर बोलून हे सर्व कृत्य करण्यास भाग पाडले . याबाबत सायबर सेलकडे तक्रार येताच तात्काळ कारवाई करीत आरोपीला थेट तामिळनाडू मधून अटक करण्यात आली आहे.

लोकेश कुमार ( ५/०  शंकर,  क्रं. ०४, गंगाइ अम्मान कोइल, फर्स्ट स्ट्रीट, अन्नानुर, अन्नानुर रेल्वे स्टेशन जवळ, चेन्नई, राज्य तमिळनाडु) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने फिर्यादी यांना फोन करून स्वतः आयकर विभागाची व इतर कारणे सांगत धमकी देत अटक केली जाईल अशी धमकी दिली. तसेच तुमच्या नागपूरच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत आहे, तसेच फिर्यादी यांचे नावाने कॅनडा देशात अवैध पार्सल पाठविले जात असल्याने नॅशनल सेक्युरीटीचा इश्यु असल्याचे सांगुन, आयकर विभागामार्फत कारवाई करून केसमध्ये अटक करण्यात येईल, अशी धमकी दिली. असे सांगुन सदर केसमध्ये अटक न करण्याकरिता तसेच जामीनाच्या नावाखाली वेगवेगळया बँक खात्यावर टप्याटप्याने एकुण २१ लाख २२ हजार ८०० रुपये भरण्यास भाग पाडले. हा सर्व व्यवहार ०६ ते ११ ऑगस्ट दरम्यान झाला. 

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
collector bro kerala ias officer n prashantha suspended
Kelara IAS Officer: ‘कलेक्टर ब्रो’ IAS अधिकारी निलंबित; वरीष्ठ अधिकाऱ्यावर जाहीररीत्या आगपाखड केल्यावरून कारवाई!

हेही वाचा : नवी मुंबईत पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक गैरसोयीचे; नव्या वेळापत्रकाबाबत रहिवाशांच्या संमिश्र प्रतिक्रिया

मात्र वारंवार जामिनासाठी पैशांची मागणी वाढल्याने आपली फसवणूक होत असल्याची खात्री फिर्यादी यांना पटली. त्यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी तात्काळ पाऊले उचलत फिर्यादी यांनी फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँक खाते गोठविणे बाबत पत्र व्यवहार करण्यात आला. गुन्हयात वापरलेले बँक खाते व मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून संशयीत इसमाचे चेन्नई, तमिळनाडू येथे वास्तव असल्याची माहिती प्राप्त झाली. सायबर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते व पथक यांनी चेन्नई, तमिळनाडू येथे जावुन आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने व त्यानी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

हेही वाचा : राजकीय कार्यक्रमांमुळे होणाऱ्या बेशिस्त पार्किंगचा वाहतुकीला फटका; महापालिका बेफिकीर

सदरचा आव्हानात्मक सायबर गुन्हा पोलीस आयुक्त मिलींद भारंबे,पोलीस सहआयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमित काळे,  सहाय्यक आयुक्त विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उप निरीक्षक लिंगराम देवकत्ते, विजय आयरे, विनोद हिरे, संदिप सोलाट, पोलीस नाईक, मंगेश गायकवाड, पोलीस शिपाई नरहरि क्षीरसागर व महिला पोलीस शिपाई पुनम गडगे यांनी उघडकीस आणला आहे.