नवी मुंबई : आजवर देशात हवा प्रदूषणात दिल्ली आघाडीवर आहे. मात्र आता दिल्लीच्या पंगतीत नवी मुंबई येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीमध्ये सकाळी देखील हवेत धुके निदर्शनास येत असतात. आता तसाच प्रत्यय नवी मुंबई शहरात येत आहे. प्रातःकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान हवेत धुक्याची चादर पसरलेली निदर्शनास येत असून नागरिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे. आता शहरवासीयांना मारण्याचा मनसुबा आहे का? असा तीव्र संताप नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या नोंदीनुसार गुरुवारी शहरातील नेरुळ विभागात अतिखराब सर्वोच्च ३०१ हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) नोंदवला गेला आहे.

तसेच इतर विभागातील देखील हवा गुणवत्ता निर्देशांक १०० ते १५० एक्युआय पेक्षा अधिक नोंदवला आहे. नवी मुंबई महापालिका आणि प्रदूषण मंडळाकडून सुरू असलेल्या तुटपुंज्या उपाययोजनांनी शहरातील प्रदूषण थांबणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. नवी मुंबई शहरात मागील एक महिन्यांपासून प्रदूषणाची पातळी वाढत असून हवा गुणवत्ता ढासळत आहे . हवा गुणवत्ता निर्देशांक २०० ते ३०० एक्युआय हुन अधिक आढळत आहे. मात्र शहरात रात्रीबरोबरच आता सकाळी देखील हवेत मोठ्या प्रमाणात धुके दिसत असून उग्र दर्पवास येत आहे. त्याचबरोबर शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक वाढत असल्याचे समोर येत आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

हेही वाचा : बहुप्रतिक्षीत नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते? ऑक्टोबरमधील ‘या’ तारखांची चाचपणी सुरू

दिवसेंदिवस नवी मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात अडकली जात असून आता दिल्लीतील हवा प्रदूषणाशी जणू स्पर्धाच करू लागल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवार पासून शहरात सकाळी हवेत धूलिकण दिसत आहेत. जनू थंडीच पडली असून धुरकट वातावरण निर्मिती होत आहे. सकाळी वाशी से.२६, २८ येथील नागरिकांना सकाळी व्यायामाला जात असताना याचा प्रत्यय आला आहे. गुरुवारी दुपारी देखील हवा गुणवत्ता निर्देशांकात शहरातील हवा अतिखराब नोंदविण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या नोंदीनुसार शहरात सर्वाधिक नेरुळमध्ये हवा प्रदूषण नोंदविण्यात आले असून ३०० एक्युआय हवा गुणवत्ता निर्देशांक होता तर कोपरखैरणेमध्ये १४२ एक्युआय, सानपाडा १२९ एक्युआय, कोपरीपाडा वाशी १२२ एक्युआय तर बेलापूर १०३ एक्युआय नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: जमीन हस्तांतरण अहवाल सकारात्मक करण्यास ५० हजाराची लाच ….. आरोपी सापळ्यात अडकला 

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या नोंदीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक

विभाग हवा गुणवत्ता निर्देशांक
नेरूळ ३००एक्युआय
महापे-कोपरखैरणे १४२ एक्युआय
सानपाडा १२९ एक्युआय
कोपरीपाडा वाशी १२२ एक्युआय
बेलापूर १०३एक्युआय

हवा गुणवत्ता पातळी मोजमाप

० ते ५० = चांगली
५१ ते १०० = समाधानकारक
१०१ ते २०० = मध्यम
२०१ ते ३०० = खराब
३०१ ते ४०० = अति खराब
४०१ ते ५०० = तीव्र