उरण : पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर शनिवारी दुपारी मोठमोठे दगड घेऊन जाणाऱ्या डम्परची चाके वाळूत रुतली होती. त्याचवेळी समुद्राला भरती सुरू झाली. डंपरच्या चाकाखालील वाळू हळू हळू सरकू लागली. त्यामुळे डंपर एका बाजूला कळंडू लागले. मात्र संरक्षण बांधला मजबूत करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या पोकलनद्वारे या डंपरला वाळूतून बाहेर काढण्यासाठी तब्बल तासभर प्रयत्न सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ऑनलाईन मॅपने झाली गडबड, एका नावाच्या दोन शाळांमुळे घोळ; केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकले

अखेरीस दगडाने भरलेला डंपर त्याच ठिकाणी खाली करण्यात आला. त्यानंतर पोकलनने धक्का देत डंपर वाळूतून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे जलसमाधी मिळता मिळता एक डंपर वाचले.