नवी मुंबई : नवी मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ जणांचा मृत्यू झाला असून २९७ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात अपघातांवर नियंत्रण मिळविणे आणि अपघातांची संख्या कमी करणे हे नवी मुंबई पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागांच्या अधिकाऱ्यांसमोरच आव्हान आहे.

वर्षभरात वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांविरोधात ८,८७,७७० खटले नोंदविले. या कारवाईत वाहनचालकांना १८ कोटी १९ लाखांचा दंड बजावला. यातील १ लाख ४२ हजार प्रकरणे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अपघातांचे आणि मृतांचे प्रमाण अधिक आहे. मागील वर्षी २४३ जणांचा अपघाती मृत्यू झाला तर २४६ जण जखमी झाले. विशेष म्हणजे वाढती वाहनसंख्या आणि अपघातांमुळे पोलीस आयुक्तालयात वाहतूक विभागासाठी स्वतंत्र पोलीस उपायुक्त नेमले आहेत. सुरक्षा सप्ताह वर्षभर राबविण्याची नवी मुंबईत गरज आहे.

अपघातांची कारणे

भरधाव वेगाने आणि हलगर्जीने वाहन चालविणे तसेच रस्त्यातील दोष वेळीच न काढणे, रात्रीच्यावेळी रस्त्यावरील कामे सुरू करणे, हवेतील धुलीकणांमुळे कमी दृश्यमानता असणे, कंटेनर व ट्रेलरसारख्या अवजड वाहनांवर सहचालकांची नियुक्ती न करणे, मद्यापी चालक, झेब्रा क्रॉसिंगवर पांढरे पट्टे नसणे, गतिरोधक न बांधणे, गतिरोधकांमध्ये खड्डे असणे, गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसणे, रात्रीचे पथदिवे बंद असणे, रस्त्याची कामे सुरू असणाऱ्या ठिकाणी दिशादर्शक न लावणे, रस्त्याकडेला वाहन उभे करणे अशी विविध कारणे अपघातांस आमंत्रण देत आहेत.

Story img Loader