उरण : बुधवारी पाणजे येथील २८९ हेक्टर पाणथळीवर यावर्षीही परदेशी पक्षी असलेल्या फ्लेमिंगोचे आगमन सुरू झाले आहे. त्यामुळे या पाणथळीच्या संवर्धनासाठी न्यायालयीन आणि वैधानिक पातळीवर लढणाऱ्या पर्यावरणवाद्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर पक्षी निरीक्षकानी समाधान व्यक्त केले आहे.
उरणमधील सर्वात मोठया पाणथळीचे बहुतेक वेळा जलक्षेत्र कोरडे करण्यासाठी आंतरभरतीचे पाणी अडवले जात असल्याने पर्यावरणवादी संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशनने अनेकदा आक्षेप नोंदविले आहेत. तर पर्यावरणवाद्यांना दिलासा देण्यासाठी, राज्य सरकारने अलीकडेच चेन्नई येथील संशोधन संस्थेने सूचिबद्ध केलेल्या आणि दस्तऐवजीकरण केलेल्या ५६४ पाणथळ जमिनींपैकी एक म्हणून पाणजेची नोंद यादीत केली आहे. पाणजे येथील पाण्याचे इनलेट कधीही गुदमरणार नाहीत याची काळजी घेण्याची जबाबदारी आता सिडको, रायगड जिल्हाधिकाऱ्यांची आहे.
हेही वाचा : फेब्रुवारीपासून जेएनपीए ते गेट वे अवघ्या २५ मिनिटांत; उरणकरांसाठी जलद प्रवास सुविधा
एवढ्या सुंदर, समृद्ध जैवविविधतेला गाडण्याचे हृदय कोणाचे असेल? या आणि इतर आंतरभरतीयुक्त आर्द्र प्रदेशांच्या देखभालीमुळे माशांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता सुनिश्चित होईल ज्यामुळे स्थानिक समुदायाला आधार मिळेल, असे मत सागर शक्तीचे नंदकुमार पवार यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा : Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
न्यायालयीन लढाई
पर्यावरणाच्या दृष्टीने नाजूक उरणमधील पाणथळ जमीन आणि जैवविविधता वाचवण्यासाठी वनशक्ती आणि सागर शक्ती मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर लढा देत आहेत. पर्यावरणवाद्यांसाठी वादाचा मुद्दा हा आहे की वेटलँड NMSEZ (आता NMIIA) ला चुकीच्या पद्धतीने भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे ज्यामध्ये सिडको स्वतः २६ टक्के भागधारक असल्याचे मत नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी व्यक्त केले आहे. तर फ्लेमिंगो चे आगमन हे नव्या हंगामातील सुखद अनुभव असल्याचे म्हटले आहे.