जयेश सामंत
नवी मुंबई : राज्य सरकारकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्येविषयी थेट प्रश्न उपस्थित करताना ‘आमच्या शहराचे कारभारी पाठविणारे तुम्ही कोण’ असा थेट सवाल केला. गेली ४० वर्षे आम्ही या शहराची सेवा करतो. आमच्या शहरात काय घडावे हे ठरविणारे तुम्ही कोण असा सवाल करताना गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केल्याची चर्चा आता रंगली आहे. वाशीतील भावे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून विरोधकाच्या भूमिकेत शिरलेले नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी राज्यातील नव्या सत्ता बदलानंतरही संघर्षाची आपली भूमिका कायम ठेवली असून नवी मुंबई महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाईकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येणाऱ्या नगरविकास विभागाच्या काही निर्णयांवर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केल्याने ठाणे आणि नवी मुंबईतील हा सत्तासंघर्ष अजूनही कायम असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

हेही वाचा… पाताळगंगे’च्या पाण्यासाठी नवी मुंबईचे प्रयत्न; नव्या प्रकल्पांमुळे लोकसंख्येत मोठी वाढ होण्याच्या शक्यतेमुळे जलसंपदा विभागाला पत्र

अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत असताना नाईकांनी यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोष नाही अशी सारवासारवही केली, मात्र त्यांच्या प्रश्नांचा रोख थेट नगरविकास विभागावर असल्याने हा छुपा संघर्ष मात्र लपून राहिला नाही.

अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना भान ठेवा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून अजब फतवे निघू लागले. नवी मुंबई महापालिकेत एकेकाळी अर्धे अधिकारी हे प्रतिनियुक्तीवर असायचे तर अर्धे हे कायम सेवेतील असायचे. महापालिकेत कायम असलेल्या अधिकाऱ्यांना शहराची खडानखडा माहिती असते. २०१९ नंतर मात्र अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे हे प्रमाण पाळले गेले नाही. महापालिकेतील विद्यामान शहर अभियंता संजय देसाई यांना निवृत्त होण्यास आणखी पाच महिन्यांचा कालावधी आहे.

हेही वाचा… विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका; मेट्रोची आता ५० स्थानके

असे असताना त्यांच्या जागी कोण शहर अभियंता होणार ही शिफारसही कायम झाली आहे. आमच्या शहरात काय घडावे हे ठरविणारे तुम्ही कोण? असा थेट सवाल यावेळी गणेश नाईक यांनी केला. आमच्या शहराचे कारभारी पाठविणारे तुम्ही कोण? थोडे तरी भान ठेवा. मी यासंबंधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, असेही नाईक यावेळी म्हणाले. इथल्या अधिकाऱ्यांना शहराच्या खाणाखुणा माहिती असतात. तुम्ही पाठविणारे अधिकारी बुद्धिमान असतीलही, मात्र शहर समजून घ्यायला त्यांना वेळ लागतो. अशाने नवी मुंबईसारख्या चांगल्या शहराचे नुकसान होईल अशा शब्दांत नाईकांनी सरकारकडून पाठविण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्येवर आक्षेप घेतला. काही लोकांना वाटते हे शहर आमच्या ताब्यात आले. काही अधिकारी कर्तव्यापेक्षा अधिकार गाजविण्यात मग्न दिसतात. मात्र शहर तुमचे नाही लोकांचे आहे हे लक्षात ठेवा, या शब्दांत नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली. नवी मुंबई शहराच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगरविकास विभाग सातत्याने चांगले निर्णय घेत असते.

विरोधकांकडून टीका

नवी मुंबईत सत्ताधारी असताना कुणी काय दिवे लावले हे संपूर्ण नवी मुंबईने अनुभवले आहे. महापालिकेच्या कंत्राटी कामांमधील टक्केवारी बाबा म्हणून कोण प्रसिद्ध होते हेही नवी मुंबईकरांना माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वंकष विचार करून आणि नवी मुंबई महापालिकेच्या सक्षमीकरणासाठी तसेच पारदर्शक कारभारासाठी घेतलेले निर्णय स्वत:ला शहराचे कारभारी म्हणविणाऱ्यांना खुपले असतील तर तो त्यांचा दोष म्हणायला हवा, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांनी पत्रकारांना दिली.