उरण : नगरपरिषदेची शहरातील कचरा उचलणारी वाहने जीर्ण झाली आहेत. त्यामुळे ती भररस्त्यात अचानक बंद पडत आहेत. त्यावेळी कर्मचाऱ्यांना आपलं कचरा गोळा करण्याचं काम सोडून या बंद वाहनांना धक्का देण्याचं काम करावं लागत आहे. याचा कचरा उचलण्यावर परिणाम होत आहे.
नगरपरिषदेच्या वाहनांच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. यातील अनेक वाहनांची झाकणे नादुरुस्त झाली आहेत. त्यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
हेही वाचा : नादुरुस्त फुंडे मार्गाची दुरुस्ती; फुंडे, डोंगरी, पाणजेतील ग्रामस्थांना दिलासा
अशाच प्रकारे सोमवारी येथील कर्मचाऱ्यांवर भररस्त्यामध्ये बंद पडलेल्या वाहनाला धक्का मारण्याची वेळ आली होती. यामुळे रस्त्यांवर पडलेला कचरा उचलण्याऐवजी कचरा उचलणाऱ्या वाहनांनाच धक्का मारण्यात कर्मचाऱ्यांचा वेळ जातं असल्याचे चित्र उरणच्या रस्त्यांवर पहायला मिळत आहे. या संदर्भात उरण नगरपरिषदेने गांभीर्याने पाहणे आता गरजेचे झाले आहे.