नवी मुंबई: वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत नोव्हेंबरअखेर तसेच डिसेंबरपासून द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात होत असते. मात्र परतीच्या पावसाने उशिराने छाटणी झाली आहे, त्यामुळे यंदा बाजारात डिसेंबर अखेरीस द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. यावर्षी द्राक्षांचा हंगाम सुरू होण्यास विलंब होणार असल्याचे मत घाऊक व्यापारी व्यक्त करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एपीएमसी बाजारात साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत द्राक्षांची आवक सुरू होते. जानेवारीमध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते. साधारण १५ नोव्हेंबरनंतर द्राक्षची आवक वाढत जाऊन साधारणपणे १५ एप्रिलपर्यंत हंगाम सुरू राहतो. बाजारात नाशिक, तासगाव, सातारा आणि सांगली या ठिकाणांहून अधिक आवक होत असते. मात्र यंदा पावसामुळे द्राक्षांच्या छाटणीलाच उशिरा सुरुवात झाली आहे. छाटणीला एक महिना उशीर झाल्याने उत्पादन घेण्यालाही विलंब होणार आहे. परिणामी द्राक्ष बाजारात दाखल होण्यासाठी जानेवारी महिन्याची वाट पहावी लागेल अशी माहिती सांगलीचे बागायतदार नंदकुमार पवार यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा एपीएमसी बाजारात एक महिना उशिराने द्राक्षांच्या हंगाम सुरू होणार आहे.

हेही वाचा : विमानतळबाधितांच्या आंदोलनाला ५५ दिवस पूर्ण, सरकार आणि सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष

पावसामुळे घडकुज, मनीगळीची शक्यता

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत द्राक्षच्या हंगाम सुरू होतो, ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये अधिक प्रमाणात त्याची मूळ छाटणी सुरू होते. मात्र यावेळी ऐन छाटणीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने हाताशी आलेले उत्पादन खराब झाले आहे. डाऊनी रोगामुळे द्राक्षवर पांढरी बुरशी येते तर करपा रोगात द्राक्षवर घडकुज होते (द्राक्षांचे घड कुजणे). त्यामुळे यंदा ५० टक्के द्राक्ष उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai grape season delayed this year css