नवी मुंबई : सीवूड्स विभागात पालिका व सिडकोच्या मोकळ्या जागेत शनिवारी सकाळी सीवूड्स रेल्वेस्थानक परिसरात सेक्टर २५ येथील पालिकेच्या मल:निसारण केंद्रजवळील भूखंडाभोवती हिरव्या जाळीचे कुंपण लावून बेकायदा झोपड्या उभारल्या जात होत्या. परंतु पालिकेच्या बेलापूर विभाग सहाय्यक आयुक्त यांना बेकायदा कामाबाबत माहिती देताच तात्काळ तोडक कारवाई करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिकेचा अतिक्रमण विभागही ‘अलर्ट मोड’वर असून पालिकेने नुकतेच मुख्यालय स्तरावर केंद्रीय अतिक्रमण पथक स्थापन केले आहे. बांधकाम व्यावसायिकाकंडून मात्र मनमानी करण्यात येत असून सीवूड्स सेक्टर २५ येथे नवीन टॉवरचे काम सुरू असून याच ठिकाणी विकासकाकडून बेकायदा लेबर कॅम्प उभारण्यात येत असल्याने अतिक्रमण विभागाने या झोपड्यांवर कारवाई केली आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : वाशी सेक्टर २६ येथे धुरकट वातावरण, रासायनिक कारखान्यांमधून वायू प्रदूषण पुन्हा सुरू

सीवूड्स सेक्टर २५ येथील एका बांधकाम व्यावसायिकाचे काम सुरु असून बांधकामाच्यासाठी लागणाऱ्या कामगारांसाठी लेबर कॅम्प बनवण्यात येत होता. पालिकेने तक्रार प्राप्त होताचा तात्काळ कारवाई करण्यात आली असून बेकायदा झोपड्यांवर कारवाई केली.

शशिकांत तांडेल, सहाय्यक आयुक्त, बेलापूर विभाग
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai illegal slums established by a builder demolished css