नवी मुंबई : वातावरणातील उष्मा वाढल्याने वाशीतील एपीएमसी फळ बाजारात सीताफळाची आवक वाढली आहे. पावसाने दडी मारल्याने सीताफळाला पुरेसे पाणी मिळत नसून उष्णतेमुळे सीताफळ लवकर पिकत आहे. मात्र यामध्ये त्याची वाढ खुंटत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात ९०% आकाराने लहान तर १०% मोठ्या आकाराची सीताफळ दाखल होत आहेत. त्यामुळे दर्जात्मक उत्पादनासाठी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. एपीएमसी बाजारात जुलै महिन्यात सीताफळाची आवक होण्यास सुरुवात होते, ऑगस्टमध्ये अधिक प्रमाणात आवक वाढते. बाजारात सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत सिताफळाचा हंगाम असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मात्र ऑगस्ट महिना संपुष्टात आला तरी पावसाने जणू दडीच मारली आहे. तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे सीताफळ पिकावर परिणाम होत आहे. सीताफळ हे महाराष्ट्रात पुणे व नगर जिल्ह्यातून दाखल होत असते. सीताफळ परिपक्व होण्यासाठी पाण्याची गरज असते. मात्र सध्या पाऊस नसल्याने वातावरणातील उष्णता वाढली आहे. त्यामुळे सीताफळाची पुरेशी वाढ होत नसून लवकरच तोडणी करावी लागत आहे. सध्या बाजारात २०-२५ गाड्या दाखल होत आहेत. यामध्ये ९० % आकाराने छोटे सीताफळ दाखल होत आहेत.

हेही वाचा : प्रदूषण करणाऱ्या ६५ रासायनिक कंपन्यांवर प्रदूषण मंडळाचा कारवाईचा बडगा

सीताफळाची वाढ होण्यासाठी पावसाची गरज आहे. पावसाच्या नैसर्गिक पाण्याने सीताफळ वाढ अधिक चांगली होते असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत बाजारभाव ही घसरले आहेत. मागील वर्षी घाऊक बाजारात प्रतिकिलो सीताफळाला ५०-२०० रुपये दराने विक्री होती, परंतु आता ३० – १२० रुपयांवर विक्री होत आहे.