उरण : पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रामुळे जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात येत असून रविवार (१ ऑक्टोबर) पासून जेएनपीटी मधून सुटणारी लाँच ही भाऊचा धक्का ऐवजी गेट ऑफ इंडिया या मार्गावर जाणार आहे, अशी माहिती जेएनपीटी वाहतूक विभागाने दिली आहे. पावसाळ्यातील चार महीने भाऊचा धक्का (फेरी वार्फ जेट्टी) पर्यंत जाते. या संदर्भात जेएनपीटीच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक प्रसिद्धी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : उरणमध्ये धुके की प्रदूषणाचे धुरके ?

उरण मधील मोरा व जेएनपीटी या दोन्ही बंदरातून जलसेवा सुरू आहे. या दोन्ही सेवा बारमाही म्हणजे पावसाळ्यातही सुरू असतात. यातील मोरा ते मुंबई (भाऊचा धक्का) या सेवेचे पावसाळी तिकीट दर वाढविण्यात येतात. तर जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ही सेवा आठ महीने सुरू असते. ती पावसाळ्यात बदलून जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्का या मार्गावर सुरू केली जाते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात जेएनपीटी लाँच सेवा ही रात्री दहा ऐवजी ९ वाजता बंद केली जाते. ती पुन्हा रात्री दहा वाजता पर्यंत सुरू राहील. या जल मार्गाने उरण मधील बंदर व इतर उद्योगातील अधिकारी कर्मचारी आणि नागरीकही प्रवास करीत आहेत.