पनवेल : खारघर उपनगरामध्ये सव्वाशे कोटी रुपयांहून अधिकचा निधी रस्ते काँक्रीटीकरणासाठी वापरला जाणार आहे. मात्र सध्या उपनगरामध्ये पडलेल्या जिवघेण्या खड्यांमुळे अपघात होऊन प्राण जाऊ शकतो, अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेक सामाजिक संस्था, आणि राजकीय पक्षांनी महापालिका प्रशासनाकडे काँक्रीटचे रस्ते बांधेपर्यंत डांबरी रस्त्यातील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली आहे. खारघर वसाहतीमध्ये लीटील वर्ल्ड मॉल ते उत्सव चौक या मार्गिकेवर काँक्रीटचा रस्ता बांधण्यात येणार आहे. हा मार्ग उपनगराचे प्रवेशव्दार असल्याने या मार्गावरील वाहतूकीचा ताण ध्यानात घेऊन हे विकासकाम पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी हाती घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निविदा प्रक्रीया पार पडल्यानंतर ही कामे सूरु होणार आहेत. परंतू उपनगरातील मुख्य रस्ता कॉंक्रीटचा करुन अंतर्गत मार्गाची दुरुस्ती पालिका प्रशासन कधी हाती घेणार हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. उपनगरामध्ये सध्या रयान इंटरनॅशनल शाळेच्या शेजारील गृहनिर्माण संस्थांसमोरील मार्गावर अर्धाफुटाचे खड्डे पडले आहेत. या परिसरात सिडको मंडळाने यापूर्वी पेव्हरब्लॉक लावून खड्डे बुजवले होते. मात्र सध्या हे पेव्हरब्लॉक सुद्धा निखळले आहेत. या मार्गावरुन वाहन कसे चालवावे असा प्रश्न शाळेत ये-जा करणाऱ्या पालकांना पडतो. खड्यांची अशी स्थिती खारघर उपनगरातील अनेक चौकांमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी बळीराम नेटके यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये गावदेवी मंदीर ते पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रयान शाळेसमोरील मार्गाची दुरुस्ती करण्यासाठी पत्र दिले आहे.

हेही वाचा : जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलप्रवास पूर्ववत होणार; जेएनपीटी लाँच १ ऑक्टोबर पासून भाऊचा धक्का ऐवजी गेट वे ऑफ इंडिया पर्यंत जाणार

खारघर फोरमचे पदाधिकारी मधू पाटील यांनी दिलेल्या माहितीनूसार खारघर उपनगरामधील १८ वेगवेगळ्या चौकांमध्ये खड्डे पडले असून या खड्ड्यात जिवघेणा अपघात होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली. खारघर फोरमच्या पदाधिका-यांनी उपनगरामध्ये नेमके खड्डे किती यासाठी सर्वेक्षण केले. यामध्ये ही माहितीसमोर आल्याचे मधू पाटील यांनी सांगीतले. उपनगराचा विकास पनवेल महापालिकेने जरुर करावा मात्र खड्यांमुळे यापूर्वी दोन अपघातांमध्ये दोघांचे प्राण गेले असून याची पुनरावृर्त्ती होऊ नये यासाठी पालिकेने तातडीने हे खड्डे बुजवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : शहरात आता जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी, अंशतः बदल  

खारघर उपनगराप्रमाणे कळंबोली आणि कामोठे उपनगरामध्ये अनेक रस्त्यात खड्डे पडल्याने वाहन चालविताना होडीत बसल्याचा अनुभव येतो. आयुक्त देशमुख यांनी काँक्रीटीकरणाची सुरुवात सर्व उपनगरांमध्ये सूरु केल्याने अनेक वर्ष डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीची प्रथा बंद होणार आहे. परंतू आयुक्तांनी लवकर खड्डे दुरुस्ती हाती न घेतल्यास अनेकांचे कंबरडे मोडतील, वाहने नादुरुस्त होतील अशी भिती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : थकीत मालमत्ता कराच्या सवलतीसाठी पनवेलच्या भाजपचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे घालणार

आयुक्त देशमुख पाहणी दौरा हाती घेणार

पनवेल महापालिका आयुक्त देशमुख यांचे याबाबत लक्ष वेधल्यावर त्यांनी अनंत चतुर्दशीनंतर खारघर उपनगरामधील रस्त्यांची पाहणी करुन लवकरच खड्डे बुजविण्याची कार्यवाही केली जाईल अशी भूमिका मांडली. सध्या खारघरमधील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर महापालिका टप्याटप्याने अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणार असल्याचे आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : उरणमध्ये धुके की प्रदूषणाचे धुरके ?

सिडको महामंडळाने पनवेल महापालिकेला रस्ते हस्तांतरण करण्यापूर्वी डांबराचा मुलामा लावून रस्ते हस्तांतरण केले. परंतू पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यांमध्ये भले मोठे खड्डे पडल्याने कंत्राटदाराला काम देताना सिडको मंडळाने एका वर्षांचा देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराला दिली होती. खारघर कळंबोली अशा विविध उपनगरामध्ये सध्या पाऊस कमी झाल्यावर खड्डे बुजविण्यासाठी मुरुम माती खड्यात भरुन खड्डे बुजविण्याची प्रक्रीया सुरू आहे.