नवी मुंबई : सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सी ई आय आर) पोर्टलची मदत घेत कोपरखैरणे पोलिसांनी चोरी गेलेले ३१ मोबाइल शोधून काढले आहेत. नुकतेच सदर मोबाइल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. १ लाख चाळीस हजाराचा आय फोन ते पाच हजारांच्या साध्या फोनचाही यात समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोबाइल गहाळ झाल्यावर वा चोरी झाल्यावर तो शोधणे आता सोपे झाले असून सीईआयआर या पोर्टलवर मोबाइलची तांत्रिक माहिती टाकली असता सध्या मोबाइल कोणत्या ठिकाणी आहे, त्यातील सिमचा क्रमांक काय याची माहिती मिळते. याचाच आधार घेत कोपरखैरणे पोलिस मध्ये कार्यरत असलेले हवालदार राहुल मोरे यांनी मेहनत घेत सर्व मोबाइल हस्तगत केले.

हेही वाचा : उरण: जेएनपीए बंदर मार्गावर रसायनाचा टँकर उलटला, बंदराकडे जाणारा रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू

यात एक आयफोन दुबई येथून मिळवण्यात यश मिळाले आहे. सदर मोबाइल अज्ञात चोरट्याने विकला जो दुबईत वापरला जात होता. त्यात वापरण्यात येणाऱ्या क्रमांकावर संपर्क साधून सदर मोबाइल चोरीचा असल्याचे सांगण्यात आले होते. सर्वच मोबाइल हे लोकेशन आणि त्यात वापरला जाणारा क्रमांक मिळवत स्थानिक पोलिसांच्या मदतीने हस्तगत करण्यात आले आहेत. या सर्व मोबाइल संचांची एकत्रित किंमत सुमारे आठ लाख रुपये आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai kopar khairane police returned stolen mobile to 31 owners css