पनवेल : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्राच्या (नैना) परिसरामध्ये ४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर गृहनिर्माण प्रकल्प बांधलेल्या सात खासगी बांधकाम व्यावसायिकांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याने सिडको महामंडळाने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर या प्रकल्पातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील १७१ सदनिकांच्या विक्रीसाठीचा निर्णय घेतला आहे. सोडतीची प्रक्रिया २१ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. विहिघर, चिंध्रण, पोयंजे आणि आकुर्ली या गावांमधील हे गृहप्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून या प्रकल्पातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी ७ आणि अल्प उत्पन्न गटांसाठी १६४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

या घरांचे क्षेत्रफळ २७ ते ५० चौरस मीटर आहे. या घरांच्या किंमतीसुद्धा सामान्यांना परवडणाऱ्या असतील. सिडको मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार पोयंजे येथील घर १० लाख रुपयांना तर चिंध्रण परिसरातील घर २४ लाख रुपयांमध्ये विक्री केली जाणार आहेत. सोडतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक अर्जदारांना अवघ्या चार हजार रुपयांमध्ये सिडको मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. सिडको मंडळ या सोडतीमध्ये सुलभकाचे काम करणार असून लाभार्थी निवडीनंतर थेट संबंधित खासगी विकसक आणि लाभार्थी यांच्यामध्ये व्यवहार होणार आहे.

new luxurious administrative building of thane municipal corporation will be constructed on site of Raymond Company residents oppesed
निसर्गसंपन्न परिसर म्हणून कोट्यावधींची घरे घेतली पण, तेच नष्ट होतेय
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Applicants disapproval due to prices for CIDCO preferred houses navi Mumbai news
२६ हजार घरे, १५ हजार अर्जदार; ‘सिडको’च्या पसंतीच्या घरांसाठी दरांमुळे नापसंती
ग्रामीण भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; चोरट्याकडून १६ लाखांचा ऐवज जप्त
Zero response for 713 houses out of 2264 houses of MHADA Konkan Board
म्हाडा कोकण मंडळाच्या घराकडे इच्छुकांची पाठ, २२६४ घरांपैकी ७१३ घरांना शून्य प्रतिसाद
Mumbai Municipal Corporation will levy property tax on commercial slums to boost Revenue starting surveys
झोपडपट्यामधील व्यावसायिक गाळेधारक मालमत्ता कराच्या कक्षेत सुमारे ६०० झोपड्यांना पाठवली देयके
Nalasopara unauthorised building vasai virar municipal corporation
नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
bombay hc allows sheth developers to complete building no 8 in vasant lawns project in thane
पाचपाखाडीस्थित वसंत ल़ॉन्सच्या १२६हून अधिक सदनिका खरेदीदारांना दिलासा

हेही वाचा : शासकीय योजनेत सिडकोची आर्थिक फसवणूक; तब्बल ७९ लाख ४९ हजाराची

नैना प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे, असा सूर पनवेलच्या ग्रामीण भागात सूरु असताना सिडको मंडळाने नैना प्रकल्प क्षेत्रात खासगी विकासकांनी बांधलेल्या घरांपैकी २० टक्के घरांच्या विक्रीसाठी पाऊले उचलली आहेत. नैनाच्या विकास नियमावलीनुसार चार हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे. सात खासगी विकासकांनी नैना प्रकल्पात एकूण क्षेत्रफळापैकी २० टक्के जागा ही आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांच्या सदनिकांसाठी नैना प्रकल्प परिसरामध्ये निर्माण केली आहेत.

हेही वाचा : अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओची करडी नजर; एका दिवसात तब्बल १४ वाहनांवर कारवाई

२१ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज

या योजनेत सहभागी होणाऱ्या इच्छुकांना lottery.cidcoindia. com या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने २१ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन सोडतीसाठी पात्रता निश्चिती करण्यात येईल. इच्छुक अर्जदार भेट देऊन सदर गृहनिर्माण योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे सिडकोच्या अधिकृत समाज माध्यमांवरून देखील सदर योजनेविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. ऑनलाइन शुल्क भरणा २९ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहील. सोडतीकरिता स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २ नोव्हेंबर तसेच अंतिम ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत ८ नोव्हेंबर रोजी सिडको भवन येथे काढण्यात येणार असल्याची माहिती सिडको मंडळाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली.

Story img Loader