नवी मुंबई : गेल्या आठवड्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाचे आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी आंदोलनास हिंसक वळण लागले त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचा निषेध करण्यासाठी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई आघाडी तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.
हेही वाचा : खारघरमध्ये एनएमएमटी बसला आग, सुदैवाने जिवितहानी नाही, प्रवासी सुखरूप
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा अध्यादेश निघेपर्यंत उपोषण न सोडण्याचा इशारा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. याला चार दिवसांनी मुदत देण्यात आली आहे. या दरम्यान जरांगे यांना काही झाले तर शिंदे सरकारला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संदीप सुतार, विक्रम शिंदे, विठ्ठल मोरे , माजी विरोधी पक्षनेता दिलीप घोडेकर, शाखा प्रमुख समीर बागवान, काँग्रेस प्रवक्ता नासिर हुसेन तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.