नवी मुंबई : सट्टा बाजारमध्ये गुंतवणुक करा आणि काही दिवसांत भरघोस परतावा मिळावा अशी जाहिरात दिसली तर चार हात लांब रहा . अशा जाहिरातीला बळी पडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक रोज होत आहे. नवी मुंबईतही अशाच प्रकारे एका व्यक्तीची तब्बल ४६ लाखांची फसवणूक झाली असून याबाबत आता सायबर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
सदाशिव देशमुख हे पनवेल येथे राहत असून त्यांनी ३० जानेवारीला समाज माध्यमावर एक जाहिरात पहिली त्या जाहिरात नुसार सट्टा बाजार अर्थात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कराल तर कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यांनी सुरवातीला सहज म्हणून जाहिरातीत दिलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यावेळी त्यांचा समावेश अर्जुन कपूर प्रशासक असलेल्या फॉर्च्युन या व्हाॅट्सअॅप समूहात समावेश करण्यात आला. त्या ठिकाणी सट्टा बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन चर्चा चालत होती. तसेच अनेक जण चांगला परतावा मिळाला वैगरे सकारात्मक चॅटिंग करत होते.
हेही वाचा : पनवेल : रंगपंचमीत दोन गटातील हाणामारीत पोलिसांना धक्काबुक्की
त्यामुळे देशमुख यांनी गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवले. त्यामुळे त्यांचा समावेश ज्योती राजपूत या प्रशासक असलेल्या फॉर्च्युन क्लब व्हीआयपी व्हाॅट्सअॅप समूहात समावेश करण्यात आला. त्या ठिकाणी आपण किती पैसे भरले, ते कुठे गुंतवण्यात आले आणि सद्य स्थितीत किती परतावा मिळाला आहे याची माहिती देणारे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार देशमुख यांनी तो अॅप डाऊनलोड केला. आणि सुरवातीला त्यांना चांगला परतावा मिळाला. म्हणून त्यांनी थोडे थोडे करत ३० जानेवारी ते १८ मार्च दरम्यान तब्बल ४६ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्याचा परतावा सुद्धा अॅपमध्ये दाखवला जात होता, मात्र देशमुख यांच्या बँक खात्यात जमा केला जात नव्हता. याबाबत त्यांनी अनेकदा संबंधित लोकांना विनंती केली मात्र दर वेळी उडवा उडवीची उत्तरे आणि विविध कारणे सांगून पुन्हा पैशांची मागणी हे चक्र सुरु झाले. त्यामुळे आपली फसवणूक केली जात असल्याची खात्री देशमुख यांना पटल्यावर त्यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.