नवी मुंबई : मुंबईतून एपीएमसी मार्केट स्थलांतरीत झाले तेव्हा सर्व व्यापार हा एपीएमसी मार्केट मधून होईल असे आश्वासन सरकार तर्फे देण्यात आले होते. मात्र आता नव्या कायद्याचा आधार घेत कोल्ड स्टोरेज चालक आयात केलेल्या फळांचे स्टोरेज करण्याबरोबरच कोल्ड स्टोरेज मधूनच थेट फळांचा व्यापार करत आहेत. यामुळे एपीएमसी व्यापारी आणि त्याच्यावर अवलंबून असणारे कामगार ते व्यापारी दलाल हे सर्व रस्त्यावर येतील, असा आरोप माथाडी कामगार नेते व आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

हेही वाचा : प्रियसीचा खून करणाऱ्या प्रियकराच्या मृतदेहावर महिन्याभरानंतर हत्येचा गुन्हा दाखल

तसेच अनेक बैठका घेऊन देखील कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने शनिवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. कोल्ड स्टोरेज चालकांनी अनधिकृतपणे सुरू असलेल्या फळांचा व्यापार न थांबवल्यास कोल्ड स्टोरेजला टाळे लावण्याचा इशारा यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. यावेळी मोठ्या प्रमाणात व्यापारी, माथाडी कामगार वर्ग उपस्थित होता.

Story img Loader