नवी मुंबई : विदेशात राहणाऱ्या बहुतांश भारतीय नागरिकांची घरे हि आपापल्या गावी आहेत. अशी घरे वा सदनिका बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बळकावले जाऊ शकतात. असाच प्रकार नवी मुंबईत समोर आला असून या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शेखर अय्यर, ऋषभ पटेल, आणि महेश शेट्टी असे यातील आरोपींची नावे आहेत. तर राजन बुलचंद हे फिर्यादी आहेत. राजन हे दुबई येथे राहत असून त्यांचे नागरिकत्व स्पेन देशाचे आहे. त्यांचे आई वडील रामचंद आणि गोपी यांनी १९९४ मध्ये संचायानी सिटी सेक्टर १५ येथील २ हजार ५७४ चौरस फुटाची सदनिका क्रमांक ९०१ हि विकत घेतली. त्याचा ताबा पत्र मिळाले होते. यासाठी त्यांनी २३ लाख १७ हजार ८५० रुपये विकासकाला दिले होते तर २ लाख ५६ हजार १५० बाकी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “नकली आयाळ लावलेल्या सिंहांनी…”, खासदार अमोल कोल्हे यांची अजित पवार गटावर बोचरी टीका

मात्र संचायानी सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट इंडिया या विकासकाच्या कंपनीवर पब्लिक फंडाचा अपघात झाला म्हणून रिझर्व्ह बँकेने कोलकाता न्यायालयात खटला भरला होता. त्यामुळे इमारतीचे काम थांबले होते. मात्र न्यायालयाने विशेष अधिकाऱ्यास अधिकार देत मालमत्ता ताबा घेऊन संचायानी सिटी हि इमारत योग्य करून प्रकल्प पूर्ण करण्याची परवानगी दिली व शेवटी प्रकल्प पूर्ण होऊन राजन यांना सदनिकेचा ताबा मिळाला. मात्र स्वतः विदेशात राहत असल्याने त्यांनी सदनिकेला कुलूप लावून किल्ली सोसायटी अध्यक्ष पुरुषोत्तम शर्मा यांच्या कडे दिली.  २०१९ मध्ये काही लोक तुमच्या सदनिकेचा ताबा चुकीच्या पद्धतीने घेत असून भारतात येऊन पोलीस ठाण्यात तक्रार करा असा इ मेल शर्मा यांनी राजन यांना पाठवला. २०२१ मध्ये  राजन यांचे वडील व काही वर्षात आईचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी सदर सदनिका राजन यांच्या नावे केल्याचे मृत्यू पत्रात त्यांनी नमूद केले होते. 

हेही वाचा : अखंड देशाचा विकास न करणाऱ्या व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता  – शरद पवार

जुलै २०२२ मध्ये ऋषभ पटेल यांनी राजन यांच्या सदनिकेत प्रवेश करीत आतील काही बदल बांधकाम सुरु केल्याची माहिती शर्मा यांनी राजन यांना दिली. यात शेखर अय्यर याने सदर सदनिका राजन यांच्या वडिलांनी त्यांना विकल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून हि सदनिका ऋषभ पटेल यांना विकल्याचे राजन यांना कळले. मात्र हे सर्व खोटे असल्याचा दावा करीत वडिलांची सही बनावट असल्याचा हि दावा राजन यांनी केला. शेखर याने महेश शेट्टी नावाच्या व्यक्तीची मदत घेत बनावट कागदपत्रे बनवली असल्याचा दावा हि राजन यांनी केला आहे. या प्रकरणी राजन यांनी भारतात येऊन सीबीडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल  घेत शेखर अय्यर , महेश शेट्टी आणि ऋषभ पटेल यांच्या विरोधात फसवणूक, कागदपत्रांची अफरातफर आणि कट रचणे आदी कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 