नवी मुंबई : किल्ले गावठाण ते आरेंजा कॉर्नरपर्यंत पाम बीच मार्गावर विविध ठिकाणी असलेले छोटे पूल व जंक्शनच्या ठिकाणाच्या रस्त्याची मायक्रोसर्फेसिंगद्वारे दुरुस्ती करण्यात येत असून या कामासाठी वस्तू व सेवा करासह १० कोटी रुपये खर्चाचे काम नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी खराब झालेल्या पाम बीच मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येत असून या कामाला पालिकेने सुरुवातही केली आहे. त्यामुळे आगामी काळात या मार्गावरील वाहतूक आणखी सुरळीत होणार आहे.

पामबीच मार्गावरील प्रवासाला शहरातील तरुणाईबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे प्राधान्य असताना शहराच्या भौतिक विकासाबरोबरच शहराच्या सौंदर्यात भरीव व आकर्षक भर टाकण्यासाठी पालिका सातत्याने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुधारणा करते. या वेगवान मार्गावरील रस्त्याची सुधारणा करण्याचे काम पालिकेने हाती घेतले असून या मार्गावर छोटे पूल तसेच सिग्नलजवळील जंक्शनजवळ मायक्रोसर्फेसिंगचे काम करण्यात येत आहे. बेलापूर येथील किल्ले गावठाण येथून सुरू होणाऱ्या व वाशी येथील आरेंजा कॉर्नरपर्यंत पाम बीच मार्गावर विविध जंक्शन आहेत.

Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Water Logging due to heavy rainfall at Bhandup railway station.
Mumbai Local Train Updates : पावसामुळे १०० लोकल फेऱ्या रद्द; मेल-एक्स्प्रेस आठ तास खोळंबल्या
Chemical tanker accident on mumbai ahmedabad highway
पालघर : महामार्गावर रसायनाचा टँकर उलटला; रसायन घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड
Traffic of express trains continues on the third and fourth lines of central railway
तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेवरुन एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची वाहतुक सुरूच
Vasai, Pedestrian bridge work, National Highway,
वसई : राष्ट्रीय महामार्गावर पादचारी पुलांची कामे अंतिम टप्प्यात, रस्ते ओलांडून होणारे अपघात रोखणार
fog on railway track
कल्याण: दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल अर्धा तास उशिरा
Shiv-Panvel highway, Shiv-Panvel highway potholes ,
मुंबई : शीव-पनवेल महामार्ग खड्ड्यांतच

हेही वाचा… नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरासाठी वारकऱ्यांचे भजन

बेलापूर येथील महापालिका मुख्यालयासमोरील किल्ले गावठाण सिग्नल तसेच सेक्टर ५० कडे जाणारा चौक, एनआरआय कॉम्पेक्सजवळील चौक, अक्षर चौक, टी एस चाणाक्य चौक, वजरानी चौक, सारसोळे चौक तसेच सानपाडा मोराज सर्कल तसेच आरेंजा कॉर्नर अशा पाम बीच मार्गावरील सर्वच चौकांच्या ठिकाणची तसेच खाडीकडे जाणारे छोटे पूल या ठिकाणी मायक्रोसर्फेसिंगची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. या मार्गावरील असलेली सततची वाहतूक यामुळे ही कामे रात्रीच्या वेळी करण्याचा प्रयत्न पालिकेच्या मार्फत सुरू आहे. पामबीच मार्गावरील या कामासाठी ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली असून या कामाचा दोषनिवारण कालावधी सात वर्षे देण्यात आला आहे. मे. मार्कोलाइन्स पेव्हमेंट टेक्नॉलॉजिस या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे.

पाम बीच मार्गावर अनेक ठिकाणी असलेल्या छोट्या पुलांवरील रस्त्याचे काम तसेच विविध ठिकाणी असलेल्या जंक्शनचे काम मायक्रोसर्फेसिंगद्वारे करण्यात येत आहे. या कामामुळे पाम बीच मार्ग वाहतुकीसाठी अधिक सुकर होणार आहे. या कामाचा देखभाल दोषनिवारण कालावधी अधिक आहे. काम वेळेत पूर्ण करण्यात येईल. – संजय देसाई, शहर अभियंता, नमुंमपा

कामाचे स्वरूप

● कंत्राटाची रक्कम- ८ कोटी ७३ लाख ३० हजार ७६३

● वस्तू व सेवा कर- १ कोटी ५७ लाख ३७ हजार ५३७

● एकूण खर्च- १० कोटी ३१ लाख ६८ हजार ३००