पनवेल : मुंबई गोवा महामार्गाचे कॉंक्रीटीकरणाचे काम दिवसरात्र केले जात असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. परंतू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रभर जागून केलेल्या पाहणीत गतीने केल्या जात असलेल्या महामार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण विरुद्ध मनसे असा संघर्ष समाजमाध्यमांवर होताना दिसत आहे. शनिवारी सकाळपासून मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर असा मंत्री रविंद्र चव्हाण यांचा बांधकामाचा पाहणी दौरा पत्रकारांसमवेत सूरु झाला. मंत्री चव्हाण हे दौऱ्यातून सरकारी अधिकारी आणि महामार्ग बांधणारे ठेकेदार कंपनी यांच्यावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गणेशोत्सवापूर्वी कॉंक्रीटची एकतरी मार्गिका पुर्ण करु असा दावा मंत्री चव्हाण यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय ‘फ्लेमिंगो फेस्टिव्हल’

मनसेचे पनवेलचे महानगर अध्यक्ष योगेश चिले यांनी रात्रीत जागून या कामाची पाहणी केल्यावर कॉंक्रीटच्या कामात सळईचा वापर केला जात नाही, तसेच कॉंक्रीटचे आच्छादन टाकल्यावर त्यावर मजूरांकरवीच कॉंक्रीट पसरविण्याचे काम सूरु असल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरविली आहे. रविवारी मनसे या महामार्गावर जागर पदयात्रा काढणार असल्याने राज्य सरकार जागे झाले असल्याचा मनसेचा दावा आहे. या दरम्यान शनिवारी सकाळी मंत्री चव्हाण यांनी महामार्गाची पाहणी करुन संपुर्ण पाहणीनंतर पत्रकारांना प्रतिक्रीया देऊ असे सांगितले.