नवी मुंबई : वायग्रा सीएलएस, लेव्हिट्रा व इतर औषधे विकण्याची कुठलीही परवानगी नसताना या औषधींची विक्री करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या बेकायदा औषधे विक्रीसाठी सुरू करण्यात आलेल्या कॉल सेंटरला सील ठोकण्यात आले आहे. 

वाशीत कुठलीही परवानगी न घेता कॉल सेंटरद्वारे औषध विक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती . या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकल्यावर धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. त्यानुसार आरोपी संकेत महाडिक याने ‘फ्रेंड्स सोल्युशन’ नावाने वाशीतील रियलटेक पार्क (शॉप नं. १२०७, से ३० अ) या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बनावट कॉल सेन्टर सुरू केले होते. लोकांशी फोनद्वारे संपर्क करण्यासाठी त्याने भरतीही केली. 

scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
Cheating with the lure of a young woman in Ganjajmun Nagpur news
गंजाजमुनात मौजमजा करायला आला अन् सुंदर तरुणीच्या आमिषाने फसला
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल

हेही वाचा : शाळा दत्तक योजनेविरोधात रविवारी सुट्टीच्या दिवशी महापालिकेच्या शाळा सुरू, पालकांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

विदेशी ग्राहकांचा डेटा हा त्याने मुबिन, नौशाद (रा. मालाड, मुंबई) यांच्याकडुन विकत घेतला. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २२ जणांनी त्यांच्या फायद्याकरीता त्यांचे सुडो नेम चेंज करून कॉलसेंटरमधील आय फोनव्दारे युएसए देशातील नागरीकांना वोईप प्रणाली द्वारे (VOIP CALL) काॅल करून त्यांना वायग्रा सीएलएस, लेव्हिट्रा व इतर औषधांची विक्री केली होती. विशेष म्हणजे त्यांच्याकडे औषधे विकण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र नव्हते.

हेही वाचा : शेती, डोंगर आणि वृक्ष नष्ट होत असल्याने दसऱ्याचे तोरण महागले; भाताचे कणीस, आंब्याची पाने आणि रानफुलं घटली

तसेच विक्री करून आलेले पैसे कंपनीच्या इनव्हेटीओ इनफोटेक प्रा.लि या नावाने एका बँकेत जमा होत होते. त्यांच्या विरोधात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय बिनतारी तारा यंत्र अधिनियम ५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. तपास पूर्ण झाल्यावर याबाबत अधिक माहिती दिली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.