नवी मुंबई : वायग्रा सीएलएस, लेव्हिट्रा व इतर औषधे विकण्याची कुठलीही परवानगी नसताना या औषधींची विक्री करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या बेकायदा औषधे विक्रीसाठी सुरू करण्यात आलेल्या कॉल सेंटरला सील ठोकण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वाशीत कुठलीही परवानगी न घेता कॉल सेंटरद्वारे औषध विक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती . या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकल्यावर धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. त्यानुसार आरोपी संकेत महाडिक याने ‘फ्रेंड्स सोल्युशन’ नावाने वाशीतील रियलटेक पार्क (शॉप नं. १२०७, से ३० अ) या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बनावट कॉल सेन्टर सुरू केले होते. लोकांशी फोनद्वारे संपर्क करण्यासाठी त्याने भरतीही केली.
हेही वाचा : शाळा दत्तक योजनेविरोधात रविवारी सुट्टीच्या दिवशी महापालिकेच्या शाळा सुरू, पालकांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
विदेशी ग्राहकांचा डेटा हा त्याने मुबिन, नौशाद (रा. मालाड, मुंबई) यांच्याकडुन विकत घेतला. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २२ जणांनी त्यांच्या फायद्याकरीता त्यांचे सुडो नेम चेंज करून कॉलसेंटरमधील आय फोनव्दारे युएसए देशातील नागरीकांना वोईप प्रणाली द्वारे (VOIP CALL) काॅल करून त्यांना वायग्रा सीएलएस, लेव्हिट्रा व इतर औषधांची विक्री केली होती. विशेष म्हणजे त्यांच्याकडे औषधे विकण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र नव्हते.
हेही वाचा : शेती, डोंगर आणि वृक्ष नष्ट होत असल्याने दसऱ्याचे तोरण महागले; भाताचे कणीस, आंब्याची पाने आणि रानफुलं घटली
तसेच विक्री करून आलेले पैसे कंपनीच्या इनव्हेटीओ इनफोटेक प्रा.लि या नावाने एका बँकेत जमा होत होते. त्यांच्या विरोधात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय बिनतारी तारा यंत्र अधिनियम ५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. तपास पूर्ण झाल्यावर याबाबत अधिक माहिती दिली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.