नवी मुंबई : रविवार पार पडलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत पोलीस विभागानेही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कारही केला, शिवाय त्यांच्या समवेत सहभोजन घेतले. रविवारी पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडुन प्रत्येक पोलीस घटकात आपआपले स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात विविध पोलीस ठाणे व त्यांचे अंतर्गत येत असलेल्या पोलीस वसाहती, हुतात्मा स्मारक , इतर शाखा प्रभारी अधिकारी यांना त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई या ठिकाणी नेमणुकीस असलेले सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांना सदरची मोहीम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदर मोहीम ही सर्व पोलीस ठाणे इतर शाखेच्या प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेकडुन त्यांचे स्तरावर यशस्वीरित्या राबविली असुन त्यांनी त्यांचे अंतर्गत येत असलेल्या पोलीस वसाहतींमध्ये जावून देखील सदरची स्वच्छता मोहीम राबविलेली आहे. उरण पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या चिरनेर हुतात्मा स्मारक येथे उरण पोलीस ठाणे नेमणुकीतील ०२ पोलीस अधिकारी, ०९ पोलीस अंमलदार त्याचप्रमाणे तेथील ग्रामस्थ यांचे मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याशिवाय पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई या ठिकाणी पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्यासह सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीमेमध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा : रेल्वे प्रशासनाला आधुनिकतेची गरज 

पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई नेमणुकीस असलेल्यांपैकी एकुण ४० पोलीस अधिकारी व २९५ पोलीस अंमलदार व मंत्रालयीन स्टाफच्या मदतीने पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे पोलीस मुख्यालय, कळंबोली, नवी मुंबई व मोटार परिवहन विभाग, नवी मुंबई या ठिकाणी देखील तेथील नेमणुकीतील पोलीस अधिकारी, अंमलदार, शाळकरी मुले व इतर निमंत्रित मान्यवर अशा एकूण ३५० जणांच्या उपस्थितीमध्ये नमुद स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेली आहे.

हेही वाचा : पनवेल: रेल्वे प्रशासनात आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा 

याशिवाय  पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांचे हस्ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आस्थापनेवर नेमणुकीस असलेल्या सर्व सफाई कामगार यांचा सत्कार करण्यात आलेला असून त्यांचे जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती. या मोहीमेचे औचित्य साधुन नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील पोलीस मुख्यालय, नवी मुंबई येथून आज सेवानिवृत्त होत असलेले सहायक पोलीस उप-निरीक्षक श्रीरंग पाडुरंग मोरे यांचा व त्यांचे कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai police department participated in cleanliness drive appealed by pm narendra modi on mahatma gandhi jayanti css