नवी मुंबई : नवी मुंबईत भाडेकरू देताना ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही, मात्र पोलिसांना भाडेकरूची वैयक्तिक माहिती आणि फोटो देणे अनिवार्य आहे. या बाबत नुकतेच लोकसत्ताने वृत्त प्रसारित केले होते. नवी मुंबई पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत आता भाडेकरूंना अथवा जागा मालकाला पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही, अशी सोय केली आहे. यासाठी https://www.navimumbaipolice.gov.in/tenant-info ही लिंक दिली असून यावर भाडेकरूची माहिती देता येते. आजकाल स्मार्ट फोन अथवा संगणक सर्रास सर्वत्र असल्याने घरबसल्या ही माहिती भरता येते. त्यामुळे वेळ वाचतो आणि सहज सुलभता येते परिणामी नागरिकांची सोय आणि पोलिसांना आवश्यक असणारी माहिती एका क्लिकवर मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : ओढ घरी जाण्याची, पण धास्ती जिवाची; सारसोळे दुर्घटनेतील नागरिकांची व्यथा..

शहरात आर्थिक फसवणूक तसेच अन्य गुन्हे करण्यासाठी भाडेकरु जादा पैसे देऊन भाड्याने राहून गुन्हे करून पळून गेल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी भाडेकरूची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य केले आहे. यासाठी पोलिसांनीही नागरिकांना आवाहन केले आहे. नवी मुंबईतील नागरिकांना आता घर किंवा जागा भाड्याने देण्यासाठी किंवा घेण्यासाठी पोलिसांच्या कोणत्याही प्रकारच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही किंवा कोणालाही त्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. त्यासाठी आपण फक्त वरील लिंकवर क्लिक करून दिलेला ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे. आपण जी माहिती देणार आहात ती पूर्णपणे खरी द्यायची असून त्याचा पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे असणार आहे व ही सुविधा संपूर्णपणे विनामूल्य आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.