नवी मुंबई : पामबीच मार्गावर पालिकेच्यावतीने मायक्रोसर्फेसिंगचे काम सुरु आहे. परंतु या कामामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पामबीच मार्गावर दिवसा तसेच रात्रीच्यावेळीही काम सुरू असते. रस्त्याच्या मधोमध फक्त लाल बॅरिकेड्स लावले जातात. परंतु या कामाच्या ठिकाणी सूचनाफलकांचा पत्ताच नाही. त्यामुळे वेगाने येणारी वाहने बॅरिकेड्सच्या जवळ आल्यानंतर या ठिकाणी काम सुरू असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पामबीच मार्गावर एका दिशेला असलेल्या या मार्गावर मधल्या मार्गिकेवर फक्त बॅरिकेड्स उभे केले जातात. तर बाजूच्या दोन्ही मार्गिका प्रवासासाठी खुल्या असतात. तसेच त्याच प्रकारचे सूचनाफलक किंवा रात्रीच्या अंधारात ब्लिंकर लावणे आवश्यक आहे अन्यथा मोठ्या अपघाताची शक्यता आहे.

हेही वाचा : कळंबोलीत बेपत्ता विद्यार्थीनीचा प्रियकरानेच केला खून

किल्ले गावठाण ते अरेंजा कॉर्नरपर्यंत पामबीच मार्गावर विविध ठिकाणी असलेले छोटे पूल व जंक्शनच्या ठिकाणाच्या रस्त्याची मायक्रोसर्फेसिंगद्वारे दुरुस्ती करण्यात येत असून या कामासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. खर्चाचे काम नवी मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. मे. मार्कोलाइन्स पामबीच मार्गावरील मायक्रोसर्फेसिंगचे काम करण्यात येत असून संबंधित ठेकेदाराचे मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेत नसल्याचे दिसत आहे. सध्या कामाच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी ठेकेदाराने घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : पनवेल : १६० गुंतवणूकदारांचा विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल

अनेक महिने काम सुरू राहणार

बेलापूर पालिका मुख्यालयासमोरील किल्ले गावठाण सिग्नल तसेच सेक्टर ५० कडे जाणारा चौक, अक्षर चौक, टी एस चाणक्य चौक, वजरानी चौक, सारसोळे चौक तसेच मोराज सर्कल, अरेंजा कॉर्नर अशा पामबीच मार्गावरील सर्वच चौकांच्या ठिकाणची तसेच खाडीकडे जाणारे छोटे पूल या ठिकाणी मायक्रोसर्फेसिंगची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. मायक्रोसर्फेसिंगचे काम अनेक महिने सुरू राहणार असून वाहनचालकांच्या सुरक्षेची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

“पामबीच मार्गावर मायक्रोसर्फेसिंगचे काम सुरू असून ठेकेदाराला योग्य त्या सूचना देऊन सूचनाफलक तसेच रात्रीचे ब्लिंकर लावण्यात येतील. रात्रीच्या वेळीही काम करताना योग्य ती खबरदारी बाळगण्यात येईल.” – गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, नेरुळ