नवी मुंबई : मागील वर्षांपासून लागवड कमी असल्याने लसणाचे उत्पादन कमी आहे. गेल्या वर्षीही लसणाच्या दराने उच्चांक गाठला होता. यंदाही नवीन लसूण दाखल होईपर्यंत वर्षभर लसणाचे दर चढेच राहणार आहेत.

एपीएमसी बाजारात सध्या देशी लसूण प्रतिकिलो ५०-१२० रुपये तर उटी लसणाची १००ते २५० रुपयांनी विक्री होत आहे. मागील वर्षी मे महिन्यात उटी लसणाची ९०-१४० रुपयांनी विक्री होत होती. यंदाही लसणाचे दर चढेच राहतील. नवीन लसूण दाखल झाल्यानंतरच लसणाचे दर आवाक्यात येतील अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी दिली.

हेही वाचा : उरण: अखेर उंचीरोधक हटविल्याने चार गावांतील नागरिकांना दिलासा, वाहतूक विभागाच्या अधिसूचनेनंतर उंचीरोधक हटविण्याची कार्यवाही

मार्च २०२३ मध्ये किरकोळ बाजारात लसूण ८० रुपयांवर होता. परंतु एप्रिल २०२३ नंतर लसणाची आवक कमी झाल्याने दराने उच्चांक गाठला होता. मात्र जुलै २०२३ पासून लसणाच्या दरात सातत्याने वाढ झाली होती. किरकोळीत लसणाच्या दराने ४०० रुपयांची मजल मारली होती.

Story img Loader