नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करत असताना विविध उपक्रम राबवत आहेत. शनिवारीही महापे वाहतूक शाखेने वाहनांच्याद्वारे होणारे वाहन प्रदूषण आणि त्यावरील उपाय याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या जनजागृतीत विद्यार्थ्यांचा सहभाग होता. नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातात. वाहन प्रदूषण आरोग्यास घातक आहे. त्यामुळे लोकांना अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. महापे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासित अली सय्यद यांनी पुढाकार घेऊन जनतेमध्ये वाहन प्रदूषण बाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत.

हेही वाचा : नैनामध्ये पाऊल ठेवू देणार नाही ? अतिक्रमण मोहीम पथक माघारी, १०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे

if want vote then Save rivers trees and hills
मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

शनिवारी महापे वाहतूक शाखा चौकी येथे नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळा, महापे गाव येथील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचा वाहन प्रदूषण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून वाहन चालकांनी पियुसी काढणे आवश्यक आहे, वाहन चालकांनी अनावश्यक हॉर्न न वाजवता ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले. सदर पथनाट्य कार्यक्रमास ३ शिक्षक व २५ विद्यार्थी व नागरिक तसेच महापे वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार उपस्थित होते. ‘अनेकदा वयाने मोठ्या व्यक्तींना वाहन चालविण्याचे नियम वा प्रदूषण याबाबत व्यवस्थित माहिती असते मात्र त्याकडे ते गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे उद्याचे भविष्य ज्यांच्या हातात आहे अशा विद्यार्थी दशेतील मुलामुलींना हे महत्व आम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे उद्याची पिढी चांगली घडेल तसेच हि मुले आपल्या पालकांना समजावून सांगतील’, अशी भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासित अली सय्यद यांनी व्यक्त केली.